शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

गुलाबी थंडीत नयनरम्य फटाक्यांच्या आताषबाजीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 11:56 AM

रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़ त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़ 

ठळक मुद्देयंदाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाई कडून व इतर नागरिकांकडुन हुल्लडबाजीचे प्रमाण कमी सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्त

पुणे: रंगीबेरंगी बदामी आकाराचे फुगे, ख्रिसमसच्या लाल टोप्या तसेच कानटोपी, घमघमीत व गरमागरम खाद्यपदार्थचा आस्वाद, कडाक्याची थंडीत ऊबदार जॅकेट , स्वेटर घालून पुणेकरांनी नववर्षाचे जल्लोषपूर्ण व उत्साहात स्वागत केले. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कॅम्पमधील महात्मा गांधी रस्ता, टिळक रस्ता अशा मुख्य रस्त्यावर तरुणाईच्या सेलिब्रेशनला उधाण आले होते़. रात्री बाराच्या ठोक्याला काही क्षण सर्व जण स्तब्ध झाले आणि घड्याळाचा काटा जसा बारावर पोहचला़. त्याबरोबर हॅपी न्यू इयरचा एकच गजर करीत तरुणाईने मोठा जल्लोष केला़. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावरील अनेक चौकात आणि सिग्नलवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत होते़. सायंकाळीच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर रंगबेरंगी लाल, निळ्या रंगाचे फुगे दिसून येत होते. तर एलडीच्या लाईटच्या फुगे हे नवीन वर्षाच्या स्वागताचे आकर्षण वाटत होते. तरुणाईने पूर्ण रस्ता भरभरून गेला होता. रस्त्याच्या फुटपाथवर फुगे, पिपाणी , ख्रिसमस टोप्या, छोट्या बाहुल्या घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तरुण मुले व मुली नववर्षाच्या आनंदात पिपाणी वाजवण्याचा आनंद घेत होती. रस्त्यावर असणाऱ्या झाडांना लाईटच्या गजराचे डेकोरेशन करण्यात आले होते. आकर्षक लाईटच्या माळा झाडांना शोभून दिसत होत्या. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या दोन रस्त्यावर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या रस्त्यावर असणाºया कट्ट्यावर जोडपी, मित्र मैत्रिणी बसून चहा, कॉफी पिण्याचा आनंद घेत होते. तर लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण सेल्फी काढण्यात दंग झाले होते. फोटोग्राफीची नवीन क्रेझच दिसून येत होती़ फुगे विक्रेत्यांकडून फक्त फोटो काढण्यासाठी तरुणाई फुगे घेत होती. प्रमुख रस्त्यावरील हॉटेल गर्दींनी ओसडून वाहत होती़ अनेक नागरिक वेटिंग ला थांबले होते. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाई कडून व इतर नागरिकांकडुन हुल्लडबाजीचे प्रमाण कमी होते. सर्व लोक पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होताच. नववर्षाचे स्वागत करणाऱ्या तरुणाईला पोलीस मार्गदर्शन करत होते़. त्याचवेळी कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करताना दिसल्यास त्याला बाजूला घेऊन त्यांची चौकशी केली जात होती़. ़़़़़उपनगरातही गर्दीनववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहराच्या बाहेर चांदणी चौक, खडकवासला, बावधन, उपनगरांमध्ये तरुणतरुणाई घोळक्याने जमले होते़ चांदणी चौकात तरुणाईची मोठी गर्दी झाली होती़ तेथील हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले़ शहरातील पंचतारांकित हॉटेलमधून नववर्षांनिमित्त पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते़ 

टॅग्स :PuneपुणेNew Year 2019नववर्ष 2019Policeपोलिस