Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:28 IST2026-01-23T17:27:53+5:302026-01-23T17:28:25+5:30

या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे

Weekend special train will run between Pune - Nagpur; Railways will proceed with 'he' stops | Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

पुणे : सलग सुट्ट्यांमुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली असून, ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्यापुणे विभागाकडून पुणे आणि नागपूरदरम्यान विशेष शुल्कासह विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, गाडी क्रमांक ०१४६७ आणि ०१४६८ पुणे-नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष गाडीची प्रत्येकी एक फेरी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

गाडी क्रमांक ०१४६७ पुणे-नागपूर विशेष गाडी शुक्रवारी (दि. २३) दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूर येथे पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष गाडी शनिवारी (दि. २४) सकाळी ८ वाजता नागपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे दिले आहेत. या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे.

Web Title : पुणे-नागपुर वीकेंड स्पेशल ट्रेन घोषित: स्टॉप और शेड्यूल देखें

Web Summary : मध्य रेलवे यात्रियों की भीड़ को देखते हुए पुणे-नागपुर स्पेशल ट्रेन चलाएगा। ट्रेन शुक्रवार और शनिवार को चलेगी, जो दौंड और अकोला सहित प्रमुख स्टेशनों पर रुकेगी।

Web Title : Pune-Nagpur Weekend Special Train Announced: Check Stops and Schedule

Web Summary : Central Railway will run a Pune-Nagpur special train due to increased passenger traffic. The train will operate on Friday and Saturday, with stops at key stations including Daund and Akola.