कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:28 IST2026-02-20T17:28:32+5:302026-02-20T17:28:48+5:30

स्थानिक भाजपचे काही नगरसेवक महापालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणून हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत

We will firmly thwart any attempt to bring a mace to the artist's throat; Artists' warning | कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा

कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू; कलाकारांचा इशारा

पुणे: शहरातील गुडलक चौकातील ऐतिहासिक कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या हालचालींविरोधात आज राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली .या मोहिमेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या या कलाकार कट्ट्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही ठामपणे हाणून पाडू असा इशारा राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. 

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक भाजपचे काही नगरसेवक महापालिका आयुक्तांवर प्रचंड दबाव आणून हा कलाकार कट्टा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढ्यावरच न थांबता, कलाकार कट्ट्याच्या मागील बाजूस असलेल्या बंगल्याच्या प्रस्तावित रिडेव्हलपमेंट प्रकल्पाला मोठे फ्रंटेज व व्यावसायिक लाभ मिळावा यासाठी कट्टा हटवण्याची घाई सुरू असल्याची माहिती स्थानिक कलाकार व नागरिकांकडून मिळत आहे. जर ही बाब खरी असेल, तर हा प्रकार केवळ सांस्कृतिक वारशावर घाला नसून थेट व्यावसायिक स्वार्थासाठी पुण्याच्या अस्मितेची केलेली तडजोड असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title : पुणे के 'कलाकार कट्टा' को हटाने के प्रयासों के खिलाफ कलाकारों की चेतावनी।

Web Summary : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पुणे के ऐतिहासिक 'कलाकार कट्टा' को स्थानांतरित करने का विरोध किया। आरोप है कि भाजपा पार्षद पुनर्विकास परियोजना को लाभ पहुंचाने के लिए अधिकारियों पर स्थानांतरण के लिए दबाव डाल रहे हैं। इस कदम को वाणिज्यिक लाभ के लिए पुणे की सांस्कृतिक पहचान से समझौता के रूप में देखा जा रहा है।

Web Title : Artists warn against attempts to remove Pune's 'Kalakar Katta'.

Web Summary : Nationalist Congress Party opposes moving Pune's historic 'Kalakar Katta'. Allegations surface that BJP corporators are pressuring officials for relocation to benefit a redevelopment project. This move is seen as compromising Pune's cultural identity for commercial gain.