'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:01 IST2025-07-03T18:00:39+5:302025-07-03T18:01:27+5:30

मस्तानी यांच्या वंशजांना व्यासपीठावर बसून दिले नाही, म्हणून चिडण्याचे काही कारण नाही - बाजीराव पेशवा प्रतिष्ठान

'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune | 'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

'आम्हाला उशिरा आमंत्रण', मस्तानीच्या वंशजांचा पुण्यातील पेशव्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए) येथे शुक्रवारी (दि. 4) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणा-या थोरले बाजीराव् पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर राणी मस्तानी यांच्या वंशजांनी बहिष्कार टाकला आहे. आम्हाला उशिरा आमंत्रण दिले तसेच व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले. हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान आहे, अशा शब्दांत मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे. मात्र, आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत.त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे.माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (1761 ) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठांच्या वतीने सहभाग घेतला. सत्ताविसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे पणजोबा नवाब अली बहादूर 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत, लढाई लढले.

या सर्व गौरवशाली इतिहासाकडे थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. या कार्यक्रमांचे आमंत्रण देखील दोन दिवसांपूर्वी मला देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असे सांगितले आहे. माझा याला विरोध नाही,पण या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाह हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहे. आम्ही अशा प्रकारचा आमचा अपमान सहन करु शकत् नाही. याद्वारे आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी असल्याचे नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी सांगितले.

आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा

आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही डी एन ए चाचणी करायला तयार आहोत असे आवाहन नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी दिले.

आम्ही वंशजांसाठी कार्यक्रम करीत नसून, बाजीराव पेशव्यांसाठी कार्यक्रम आहोत. मस्तानी यांच्या वंशजांचा आम्ही कायम सन्मान केला आहे. त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. पण व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही, म्हणून त्यांनी चिडण्याचे काहीच कारण् नाही- कुंदन कुमार साठे, बाजीराव पेशवा प्रतिष्ठान

Web Title: 'We were invited late Mastani's descendants boycott the Peshwas statue unveiling event in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.