आम्हाला श्रेय नको, पण भोर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST2021-03-08T04:12:18+5:302021-03-08T04:12:18+5:30

भोर : शहरातील पाणीपुरवठ्याच्या कामाचे श्रेय आम्हाला नको. पण भोरकरांची पाणीपट्टीसाठी होणारी लूट थांबवून नागरिकांना पुरेसा व स्वच्छ ...

We don't want credit, but streamline Bhor's water supply | आम्हाला श्रेय नको, पण भोर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

आम्हाला श्रेय नको, पण भोर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

भोर : शहरातील पाणीपुरवठ्याच्या कामाचे श्रेय आम्हाला नको. पण भोरकरांची पाणीपट्टीसाठी होणारी लूट थांबवून नागरिकांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे व भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.

दोन वर्षे भोर शहरवासियांना भोर नगरपालिकेकडून दिवसाआड अपुरा व स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. भोरमधील नागरिकांकडून पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची वसूल केली जात आहे. ही भोर शहरवासियांची लूट आहे. ती लूट थांबवून भोर शहरवासियांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा रोजच्या रोज व्हावा, ही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रामाणिक अपेक्षा आहे. पाणीपुरवठा योजनेचे श्रेय तुम्हीच घ्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे श्रेय नको. मात्र नागरिकांना वेठीस धरू नका. यात सुधारणा झाली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: We don't want credit, but streamline Bhor's water supply