'आम्ही गावचे लोक आहोत', एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, सासवड एसटी आगारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:38 IST2026-02-28T13:38:30+5:302026-02-28T13:38:52+5:30

किरकोळ वादातून तीन तरुणांनी चालक सचिन नाळे यांना “आम्ही गावचे लोक आहोत” अशी दादागिरी करत लोखंडी रॉडने मारहाण केली

'We are the people of the village ST driver beaten incident at Saswad ST depot | 'आम्ही गावचे लोक आहोत', एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, सासवड एसटी आगारातील घटना

'आम्ही गावचे लोक आहोत', एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, सासवड एसटी आगारातील घटना

पुणे: पुणे जिल्ह्यातील सासवड एस.टी. आगारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलं आहे. अक्षरशः रक्त येईपर्यंत टोळक्याकडून चालकाला मारहाण करण्यात आली आहे. सासवड एसटी आगारातील या घटनेमुळे एसटी चालकांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

सासवड मध्ये भर दुपारी एस.टी. चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून तीन तरुणांनी चालक सचिन नाळे यांना “आम्ही गावचे लोक आहोत” अशी दादागिरी करत लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला अक्षरशः रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर देखील टोळक्याने आपली दादागिरी सुरूच ठेवली, या संपूर्ण घटनेचे चित्र मोबाईल मध्ये कैद होत असताना यातील तरुणांनी मोबाईल खाली पाडण्याचाही प्रकार केला. मारहाणीच्या घटनेत चालक अत्यंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यस्थी करणाऱ्या वाहकालाही मारहाण करण्यात आली. नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून दोघे संशयित फरार आहेत. या घटनेनंतर एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून सार्वजनिक सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : सासवड: एसटी ड्राइवर की बेरहमी से पिटाई; 'हम गांववाले हैं' धमकी।

Web Summary : पुणे के सासवड में एक मामूली विवाद के बाद एसटी ड्राइवर पर बेरहमी से हमला किया गया। तीन लोगों ने लोहे की रॉड से हमला करते हुए कहा, "हम गांववाले हैं।" ड्राइवर गंभीर रूप से घायल है, जिससे एसटी कर्मचारियों में आक्रोश है और सुरक्षा चिंताएं बढ़ रही हैं।

Web Title : Saswad: ST driver brutally beaten; 'We are villagers' threat.

Web Summary : In Saswad, Pune, an ST driver was brutally attacked after a minor dispute. Three men assaulted him with iron rods, declaring, "We are villagers." The driver is seriously injured, prompting outrage among ST workers and raising safety concerns.