शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीत जलपर्णी कुजली; जलचर धोक्यात

By admin | Updated: January 31, 2015 22:49 IST

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत.

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात साखर कारखान्यांची मळी व रसायनयुक्त पाणी सोडल्याने पाणी दूषित झाले आहेत. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी पाण्यात कुजल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे हे पाणी वापरण्याऐवजी ते फिल्टरचे पाणी वापरत आहेत. भीमा नदीवर पारगाव, सादलगाव, मांडवगण या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात पाणी अडविले आहे. नदीपात्रात येथील कारखान्याचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पाणी दूषित झाले आहे. याचा परिणाम सर्व बंधाऱ्यांध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मांडवगण फराटा तसेच कानगाव बंधाऱ्यातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भीमा नदीमध्ये सध्या पुणे व पिंपरी-चिचंवड महापालिकांचे दूषित केमिकलयुक्त पाणी व त्यात आता भीमा-पाटस कारखान्याची मळी व रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याबरोबरच या कारखान्यातील मळीही पाण्यात टाकली जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. (वार्ताहर)४मांडवगण फराटा (ता. शिरूर)- कानगाव (ता. दौंड) बंधाऱ्याच्या खालील बाजूला पाण्यात मासेमारीचा व्यवसाय चालतो. जलपर्णीमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज येथील मच्छीमारांनी व्यक्त केली. या ठिकाणी ६० ते ७० कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत आहे. येथून दररोज माशांची विक्री होत आहे; परंतु मळीमिश्रित व रसायनयुक्त पाण्यामुळे लहानमोठे मासे मेल्याने हा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.४ सोसायटी चौकाजवळ ७ ते ८ लहान मुंलाना कांजण्या आल्या आहे. सायंकाळी ५ पासून व सकाळी ६ वाजेपर्यंत डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दूषित पाणी अघोंळ वा कपडे धुण्यासाठी योग्य नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.