शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये पाणीकपात?

By admin | Updated: June 23, 2014 01:16 IST

पवना धरणात आजअखेर अवघा १८.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांत प्रथमच १६ जूनअखेर पाणीपातळीत घट झाली आहे

पवनानगर : पवना धरणात आजअखेर अवघा १८.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांत प्रथमच १६ जूनअखेर पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना व पिंपरी-चिंचवड परिसरावर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पाणीसाठा घटल्याने पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची सोमवारी तातडीची बैठक होणार आहे. धरण परिसरात १४ जूनला २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १६ जूनला १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर एकूण २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३८८ मिमी पावसाची नोंद झाली होती. आताचा पवना धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ४८ टक्के आहे. धरणाचे काम १९७२ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून पाणी पातळीत २०१२ चा अपवाद वगळता जून महिन्यात कमी झाला नव्हता. २०१२ मध्ये जुलैअखेर धरणात कमी साठा शिल्लक होता. मात्र, एक महिना अगोदर १८.८५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी २०१३ मध्ये जून महिन्यात प्रथमच ११ फुटांनी पवना धरणाची पाणी पातळी वाढली होती. ती या वर्षी खूपच कमी झाली आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेक्सने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या १.६० टीएमसी पाणी शिल्लक राहिल्याने तसेच पाणी पातळी कमी झाल्याने बाराशेऐवजी हजार क्युसेक्सने पाणी सोडावे लागणार असल्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर आणखी दीड महिने पिण्याचे पाणी पुरेल असा महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)