शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

लॉकडाऊनमध्ये पुणेकरांचा पाणी वापर वाढला; घरगुती वापराचे प्रशासनाकडून कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:59 IST

वारंवार अंघोळ करण्यापासून ते सतत कपडे धुण्यापर्यंतचा घरगुती वापर वाढला..

ठळक मुद्देहॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खासगी कंपन्या, दुकाने, खासगी कार्यालये आदी बंद

लक्ष्मण मोरे -

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सक्तीने घरी बसलेल्या पुणेकरांचापाणी वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा दीड टीएमसी पाणी पुणेकरांनी वापरल्याचे चित्र आहे. वारंवार अंघोळ करण्यापासून ते सतत कपडे धुण्यापर्यंतचा घरगुती वापर वाढल्याचे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या काळात व्यावसायिक आस्थापना बंद होत्या. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खासगी कंपन्या, दुकाने, खासगी कार्यालये आदी बंद ठेवण्यात आलेली होती. यासोबतच पुण्यातील कामगार, विद्यार्थी आणि परराज्यातून नोकरीनिमित्त आलेले चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी गेले. त्यामुळे दरवर्षी पाटबंधारे विभागाकडे वाढीव पाणी कोटा मागताना लोकसंख्येत धरली जाणारी 'फ्लोटिंग पॉप्युलेशन' यंदा मात्र आपापल्या गावी गेलेली आहे. त्यामुळे आपसूकच पाणी वापर कमी होणे आवश्यक होते. पालिकेनेही त्या प्रमाणात पाणी कमी उचलणे अपेक्षित होते. परंतु, सरासरी प्रतिदिन १ हजार ३७९ एमएलडी पाणी उचलले जात आहे. महिन्याकाठी सरासरी ४२ हजार ११२ एलएमडी अर्थातच दीड टीएमसी पाणी पालिकेकडून उचलले जात आहे.गेल्या वर्षी अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता अद्याप भासलेली नाही. शहरात सर्व बंद असताना आणि 'फ्लोटिंग पॉप्युलेशन' आपापल्या गावी परतलेली असतानाही एवढा पाणी वापर सुरूच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक पाण्याचा अधिक वापर करू लागले आहेत. पुणेकरांना दरवर्षी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारी महापालिका मात्र यंदा कोरोनामुळे असा कोणताही प्रचार करताना दिसत नाही. कोरोनामुळे नागरिकांचा पाणी वापर वाढला असला तरी धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असल्याने पाणी कमी पडण्याची चिंता पालिकेला नाही.-------------काय आहेत प्रमुख कारणे१. वारंवार हात धुणे.२. दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करणे.३. बाहेरून आल्यानंतर कपडे तात्काळ धुवायला टाकणे.४. भाज्या, दूध, पॅकिंग फूड्सची पाकिटे धुवून घेणे.--------------२०१९महिना        दैनंदिन वापर (एमएलडी)   मासिक वापर       टीएमसी

फेब्रुवारी          १,१६४                                 ३२,५९२               १.२३मार्च               १,२७४                                ३९,४९४                १.३९एप्रिल            १,३६०                                 ४०,८१०                १.४४मे                   १,२५९                               ३९,०१५                १.३८

२०२०महिना             दैनंदिन वापर (एमएलडी)         मासिक वापर                टीएमसी

फेब्रुवारी                 १,३७४                                    ३९,८१५                      १.४१मार्च                      १,४४७                                    ४४,१८३                       १.५८एप्रिल                    १,४३८                                    ४३,१४०                      १.५२मे                         १४५०                                      ४४,९३५                       १.५९--------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDamधरण