शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

उजनीच्या पाण्याने सोलापूरची तहान भागणार; भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:41 IST

इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती.

ठळक मुद्देआवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या फायदा होणार ऐन उन्हाळ्यात तरणार नदीकाठची पीके

पुणे ( बाभूळगाव) : सोलापूर शहर आणि परिसराची पूर्ण तहान भागविणाऱ्या औज बंधारा, तर टाकळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पाण्याचा प्रश्न एैरणीवर आला होता.  यामुळे  सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलेल्या उजनी जलाशयातून हे दोन्ही बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.   ऐन उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी आवर्तन सोडल्याने इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर असल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील पिके पाण्याविना धोक्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. यामुळे उजनी धरणातून बुधवारी सकाळी भीमानदीत ३२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्या- टप्प्याने वाढ करत ६४०० क्युसेक्लने पाणी सोडण्यात येणार आहे.  सोलापूर शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली होती. औज बंधारा परिसरातील भीमा नदीवरील टाकळी जॅकवेलजवळ  फक्त ९ फूट  इतकीच पाणीपातळी असून, हे पाणी सोलापूरकरांना जेमतेम आठवडाभर पुरण्याची  शक्यता असल्याने उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाºयात पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी व उजनी अधीक्षक अभियंता धिरज साळे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, पाणी विसर्ग सोडण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता.   सध्या उजनी धरण मृत साठ्यात असून ८.५३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. धरणात ५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून, या वर्षी उजनी पूर्ण क्षमतेने भरले होते.   जिल्हाधिकारी यांच्याकडे उजनीचे नियोजन...     चालू वर्षी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची पाणीपातळी ४९७.३३० इतकी होती. तर, ४९१ मीटरवरील पाणीपातळी ही उपयुक्त म्हणून गृहीत धरली जाते.  त्याचे संपूर्ण नियोजन जलसंपदा विभागाकडे असते. तर, ४९१ मीटर पातळीच्या खाली उणे पातळी हा मृतसाठा समजला जातो. याचे नियोजन जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने जिल्हाधिकारी हे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्याकडून नियोजनाबाबत माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देत असतात.------------------------ उजनी धरणातील सध्याची पाणीपातळी

उजनी धरणात एकूण पाणीपातळी   ४८९.७३० मीटरधरणाचे एकूण क्षेत्रफळ  १७४.५७ चौ. कि. मी. धरणातील एकूण पाणीसाठा   १५६१.३७  दलघमीउपयुक्त पाणीसाठा  (उणे २४१.४४ दलघमीधरणातील एकूण पाणीसाठा   ५५.१३ टी.एम.सी.उपयुक्त साठा  (उणे) ८.५३ टी.एम.सी.टक्केवारी  (उणे) १५.९१ टक्केसध्या सुरू असलेला पाणी विसर्ग.भीमा नदी - ३००० क्युसेक्स.मुख्य कॅनाल - २४२२  क्युसेक्स.भीमा-सीना बोगदा  - ३८० क्युसेक्स.------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरSolapurसोलापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी