शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:32 IST

Starlink Maharashtra: माहिती, संवाद तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली. 

Starlink in Maharashtra: ज्या ठिकाणी इंटरनेट पोहोचत नाही, तिथेही वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्राचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. स्टारलिंक करार करणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज मुंबईत स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांचे स्वागत करणे आनंदाची बाब होती. महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर आज स्वाक्षरी केली. यामुळे शासकीय कार्यालये, ग्रामीण भागात आणि गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या महाराष्ट्रातील दुर्गम आणि वंचित भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंकसोबत औपचारिकपणे सहयोग करणारे महाराष्ट्र पहिले भारतीय राज्य ठरले आहे."

"एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान (ICT) क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिच्याकडे जगातील सर्वाधिक दळणवळण उपग्रह आहेत. ही कंपनी भारतात येत आहे आणि महाराष्ट्रासोबत भागीदारी करत आहे, हा आमच्यासाठी सन्मान आहे", अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. 

या महाराष्ट्र-स्टारलिंक सहकार्यामुळे राज्याच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल महाराष्ट्र मिशनला वेग मिळेल आणि राज्यातील इलेक्ट्रिक वाहने, किनारी विकास आणि आपत्ती प्रतिरोधक क्षमता कार्यक्रमांनाही फायदा होईल.

स्टारलिंकसोबत करार केल्यामुळे राज्याच्या दुर्गम भागातही इंटरनेट सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. स्टारलिंक ही जगात सर्वाधिक सॅटेलाईट असणारी कंपनी आहे. याचा फायदा आदिवासी शाळा, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्र डिजिटल करण्यास याचा मोठा फायदा होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Get Superfast Internet with Elon Musk's Starlink

Web Summary : Maharashtra partners with Starlink, becoming the first Indian state to provide satellite-based internet to remote areas, benefiting government offices, schools, and healthcare centers. This will significantly boost digital access in rural Maharashtra.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान