शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water Cut: पुण्यातील 'या' भागात ८ ते १० दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:56 IST

Water Cut in Pune: पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे

पुणे : पवना बंधाऱ्यातून पुणे महापालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. ही गळती दुरुस्त करण्यासठी चिखली येथील जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील कळस, विश्रांतवाडी, विमाननगर या भागांस आठ ते दहा दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे महापालिकेने चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलकेंद्राला पवना बंधाऱ्यातून ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करतात. मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. महापालिकेने ही गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, या ठिकाण दलदलीचे असून जलवाहिनीवर विद्युत केबल्स, इंटरनेट केबल्स, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन इत्यादी सेवा वाहिनीचे जाळे असल्याने गळती बंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही जलवाहिनी दुरुस्त करण्याऐवजी त्याठिकाणी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यास अंदाजे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही लाईन बंद करण्यात आली आहे.या लाईनवरून पाणीपुरवठा होणाऱ्या कळस माळवाडी, जाधववस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, वर्माशेल, विमानतळ व सभोवतालच्या परिसराला पर्यायी पाण्याच्या लाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवस या भागाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

बालभारतीजवळ जलवाहिनी फुटलेली नाही

सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती जवळ जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते नंदकिशोर जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फर्ग्युसन टेकडी येथे नवीन पाण्याची टाकी उभी केली आहे. या पाण्याच्या टाकीला एसएनडीटी जलकेंद्रातून चतु:श्रुंगीला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी बालभारती येथे जलवाहिनी जोडली जाणार आहे. या कामासाठी वेल्डिंग काम करावे लागणार आहे, त्यामुळे मुख्य जलवाहिनी मोकळी करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Faces Water Supply Disruptions Due to Pipeline Leak

Web Summary : Pune's water supply will be disrupted for 8-10 days due to a major pipeline leak near Ravet. Areas like Kalas, Vishrantwadi, and Viman Nagar will experience low-pressure water supply as repairs are underway. Alternative lines are being used, but residents should expect irregularities. No leak near Balbharati, it's pipeline work.
टॅग्स :water shortageपाणी कपातWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन