Pune Water Cut: पुणे शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:15 IST2025-09-16T11:14:20+5:302025-09-16T11:15:42+5:30
Pune Water Cut News: देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असून शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार

Pune Water Cut: पुणे शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद
पुणे : पुणे महापालिकेच्या जुने पर्वती जलकेंद्र पंपिंग, वडगाव, राजीव गांधी पंपिंग, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २ एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील पंपिंग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.१८ ) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.१९) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे
पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग : सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाॅप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी. स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क १, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतिवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू गोसावी वस्ती, कॅनॉल रोड
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील शिवणे इंडस्ट्रीज परिसर
एस. एन. डी. डी. (एच.एल.आर.) परिसर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी इत्यादी. पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर : गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्रनगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.