Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद

By निलेश राऊत | Published: March 1, 2024 05:30 PM2024-03-01T17:30:59+5:302024-03-01T17:31:17+5:30

गुरूवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

Water supply stopped in Katraj Kondhwa area on Wednesday | Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद

Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद

पुणे : कोंढवा रस्त्यावरील मुख्य पाण्याच्या लाईनच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्याने, येत्या बुधवारी (दि.६ मार्च) कोंढवा बु. परिसरासह तळजाई झोनमधील बालाजीनगर, पुण्याईनगर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवारी (दि.७ मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. येत्या बुधवारी कोंढवा रस्त्यावरील ईस्कॉन मंदिर समोरील मुख्य पाण्याच्या लाईनच्या दुरुस्ती काम करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

काेंढवा बु., अप्पर इंदिरानगर परिसर :- साईनगर, गजानन नगर काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुप्पर इंदिरानगरचा काही भान, ईस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयस नगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनसर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर.

तळजाई झोनमधील भाग :- पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदर नगर, प्रकल्प सोसायटी, हस्तीनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाऊन, चैत्रबन वसाहत, अप्पर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग १ व २.

Web Title: Water supply stopped in Katraj Kondhwa area on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.