पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:10 IST2025-12-26T21:09:54+5:302025-12-26T21:10:59+5:30
लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.

पुणे शहराच्या अनेक भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत बंद
पुणे : पुणे शहराला खडकवासला ते वारजे आणि होळकर या पाणीपुरवठा जलवाहिनीला कर्वे नगर येथे फुटली. त्यामूळे या जलवाहिनीचे तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका प्रशासन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे कर्वेनगर, प्रभात रोड, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, चिकलवाडी, खडकी आणि शिवाजीनगर या भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
कर्वेनगर नंतर लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे रामटेकडी टाकीच्या अखत्यारीतील भागाचा शनिवार पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संपूर्ण हडपसर, हडपसर गावठाण, ससाणे नगर, रेल्वे लाईन कडेचा भाग, मंत्री मार्केट, गंगा रेसिडेन्सी, साईनाथ वसाहत, गाडीतळ, चिंतामणी नगर, सय्यदनगर, हडपसर इंड्रस्ट्रीयल इस्टेट, शिंदेवस्ती, भीमनगर, संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, आनंदनगर, एस. आर. पी. एफ. महंमदवाडी गाव, तरवडेवस्ती, कृष्णानगर, सातवनगर, राजीव गांधीनगर, दोराबजी पॅराडाईज, कडनगर बुस्टरवरील भाग, तुकाई दर्शन टाकी – सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर व काळेपडळ, हडपसर सोलापूर रोड डावी बाजू, साडेसतरा नळी, भोसले गार्डन, माळवाडी, मगरपट्टा सिटी, हडपसर आकाशवाणी, पिंगळेवस्ती, मुंढवा, केशवनगर, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, गुलामआली नगर, श्रीराम चौक परिसर, रामटेकडी, रामनगर परिसर अंतर्गत होणारा भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.