शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देणारे सरकार सत्तेवर येईल का? : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:20 IST

शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी गरिबांना पायपीट करावी लागते. या क्षेत्रातही राजकारण रंगत असल्याने पाण्याचा प्रश्न हा गरिबीचा प्रश्न बनला आहे.

ठळक मुद्दे शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध औद्योगिक क्षेत्राने पाण्याच्या पुनर्वापर करावा

पुणे : शेतकऱ्यांना पाणी देणारे सरकार सत्तेवर येईल का, हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. शेतकºयांनी स्वत:च प्रयत्न करुन पाणी कमवून संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अशी वेळ येणे हे दुर्दैवी आहे. कारण, सरकारने विविध योजनांमधून पाण्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. मात्र, पाणी व्यवस्थित अडवले जात नाही. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापनाचे तंत्र समजून न घेतल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे देशाची हानी होऊ शकते, असे संमेलनाध्यक्ष मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.  रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने २० मार्च ते २२ मार्च या कालावधीत तीन दिवसीय जलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जलोत्सवाचे उदघाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांतपाल अभय गाडगीळ, प्रकल्प संचालक सतीश खाडे, जलतज्ज्ञ  उपेंद्र धोंडे, प्रदीप पुरंदरे आदी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘पाण्याचा प्रश्न भारत विरुद्ध इंडिया असा निर्माण झाला आहे. शहरात पाणी सहज आणि कमी दरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी गरिबांना पायपीट करावी लागते. या क्षेत्रातही राजकारण रंगत असल्याने पाण्याचा प्रश्न हा गरिबीचा प्रश्न बनला आहे. प्रत्येक शहरी माणसाने आपले पाणी स्वत: कमवावे, वाचवावे, संवर्धन करावे, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर द्यावा. नागरिकीकरण झपाट्याने वाढत असताना पाणीरुपी संपत्तीचे वाटप समन्यायी असावे. मात्र, बरेचदा पाण्याचे समान वाटप होत नाही आणि तो राजकीय प्रश्न बनतो.’‘औद्योगिक क्षेत्राने पाण्याच्या पुनर्वापर करावा. कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडण्यावर सरकारने निर्बंध घालावेत, असे न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी. पाण्याशी निगडीत प्रयोग निष्पक्षपणे तपासून मोडीत न काढता प्रचार आणि प्रसार करावा. ती निर्दोष करण्यासाठी प्रयत्न करावेत, पाण्याचे स्रोत प्रदूषणविरहित ठेवून वृद्धिंगत करावे, असा मौैलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. अभय गाडगीळ म्हणाले, ‘पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्याचा प्रश्न अभ्यासातून मांडणे गरजेचे आहे. पुण्याप्रमाणे  पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा, विदर्भात जाऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.’‘साहेबराव करपे यांनी ३२ वर्षापूर्वी सामूहिक आत्महत्या केली. त्यानंतर आजवर शेतकरी मोर्चे, आंदोलने झाली. पण, शेतक-यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने आजवर ठोस उपाययोजना मिळाली नाही, हे दुर्दैव. अंधश्रद्धा केवळ धार्मिक नसते, जलक्षेत्रात आधुनिक अंधश्रद्धाचे पेव फुटत आहे’, याकडे उपेंद्र धोंडे यांनी लक्ष वेधले. सतीश खाडे यांनी प्रास्ताविक  केले. कोटजन्म-पुनर्जन्म, बदल, प्रेरणा आणि नवनिर्मिती अशा विविध माध्यमातून पाण्याचा प्रश्न जागतिक साहित्यामध्ये मांडला आहे. मात्र, सध्याचा प्रश्न फारसा गांभीर्याने हाताळण्यात आलेला नाही. मराठी साहित्यामध्ये पाणी आणि टंचाई असे समीकरण बनले आहे. ग्रामीण साहित्यिकांनी पाण्याचा प्रश्नाचे वास्तव साहित्यातून मांडले आहे. ‘पाणी पाणी’ हे माझे पुस्तक कालबाह्य व्हावे, अशीच लेखक म्हणून माझी इच्छा आहे. वास्तवाचा स्वीकार करून, व्यापकता समजून घेऊन ते बदलण्यासाठी प्रयत्न व्हावेत. - लक्ष्मीकांत देशमुख

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीState Governmentराज्य सरकार