शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहराला दोन दिवसांनी पाणी!

By admin | Updated: July 12, 2014 22:20 IST

पावसाळा सुरू होऊनदेखील अद्याप वीर, भाटघर धरण क्षेत्रत पाऊस नाही. त्यामुळे संपूर्ण शहरास शनिवार (दि. 12) पासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

बारामती : पावसाळा सुरू होऊनदेखील अद्याप वीर, भाटघर धरण क्षेत्रत पाऊस नाही. त्यामुळे संपूर्ण शहरास शनिवार (दि. 12) पासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणांतील राखीव साठय़ातून 25 जुलैला बारामतीच्या तलावात पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. 
शहरातील सिनेमा रोड, कचेरी रोड, पानगल्ली, सटवाजीनगर, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड रोड, संपूर्ण आमराई, हंबीर बोळ, हरिकृपानगर, सिद्धेवर गल्ली, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, तसेच साई गणोशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, आनंदनगर,  अशोकनगर, अकल्पीत हौसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्ट रोड, तावरे बंगला परिसर, विश्रम सोसायटी, जवाहरनगर या विभागांना दर दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार आहे. संपूर्ण कसबा विभाग, विद्या हौसिंग सोसायटी, विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, व्हील कॉलनी, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरुनगर, पतंगशहानगर, महादेव मळा, क्षत्रीयनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाड पेठ, गोकूळवाडी, मेडद रोड याठिकाणी दर दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा होणार आहे. 
 
नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. तोटय़ा असलेल्या नळ जोडाला तोटय़ा बसवाव्यात. नीरा डाव्या कालव्यामधून पाणी उपलब्ध झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा जयश्री सातव, मुख्याधिकारी रवी पवार आणि पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा तावरे 
यांनी दिले आहे.
 
दौंड शहराला  दिवसाआड पाणी
दौंड : दौंडला पाणीपुरवठा करणा:या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे एक आठवडा पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा आहे. तेव्हा सोमवार (दि. 14) पासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
तसेच, पाऊस लांबल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी केले आहे. नानवीज, गोपाळवाडी, लिंगाळी, सोनवडी, राज्य राखीव पोलीस बल 5 आणि 7 यांचा पाणीपुरवठा सोमवार (दि. 30) पासून बंद करण्यात आला आहे.