शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:37 IST

आम्ही सगळया वस्तू घरात ठेवून नातेवाइकांकडे गेलो होतो, त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत

पुणे: किचनमध्ये काहीच राहिलं नाही, आमचा संसार वाहून गेला. त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत, आम्ही सगळ्या वस्तू घरातच ठेवल्या होत्या. फक्त मोबाईल घेऊन नातेवाईकांकडे गेलो होतो. वॉशिंग मशीन, फ्रिज सगळं मुलांची पुस्तक, आमची महत्वाची कागदपत्रे सगळं वाहून गेलं. काही राहिलं नाही. आता आम्ही काय करायचं, आमची कोण नुकसानभरपाई करून देणार..! अशी व्यथा मांडताना सिंहगड रोडच्या विठ्ठलवाडी नदीकाठ परिसरातील नागरिकांचे अश्रू अनावर झाले.  

सिंहगड रोड परिसरातील विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातही काल पाणी शिरले होते. पण त्याठिकाणी राहणारे नागरिक नातेवाईकांकडे गेले होते. ते सकाळी घरी आले असता घरातील सर्व संसार वाहून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात  खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पार्किंगमधून गाड्या काढणेही अवघड झाले होते. काल सकाळच्या सुमारास रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. काल या सर्व पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील पाणी साचलेल्या भागात पाहणी केली होती. यावेळी विठ्ठलवाडीच्या नदीकाठ परिसरातील नागरीकांचा संसार पाण्यात वाहून गेला. माध्यमांसमोर व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

योग्य ती कारवाई होणार - मोहोळ   

आज सकाळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सिंहगड रोड परिसरात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे नागरिकांना आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, नागरिकांना हा त्रास पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहोत. काही ठिकाणी नदीपात्र अरुंद आहे, पूररेषा निश्चित करायची आहे. हे सर्वही पाहावे लागणार आहे. या भागात पाणी कधीच येणार यासाठी कायमस्वरूपीच नियोजन आपण करणार आहोत. लोकांच्या  प्रतिक्रिया आम्ही ऐकल्या आहेत. आता प्रशासकीय पातळीवर सर्व मदतकार्य सुरु आहे. लोकांना सुविधा देणे, स्वच्छ पाणी पुरवणे यासाठी महापालिकेची यंत्रणा काम करत आहे. ४० हजार क्यूसेसच्या वर पाणी सोडलं गेलं आहे. नागरिकांना त्याअगोदर अलर्ट का दिला नाही याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात का समन्वय साधला गेला नाही याचीही चौकशी केली जाईल. आणि योग्य ती कारवाई आम्ही करू. आता सद्यस्थितीत या भागातील नागरिकांना मदत करणे यालाच प्राधान्य दिले जाईल. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसHomeसुंदर गृहनियोजनDamधरणPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक