शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल शेलारची अटक बेकायदा; कोठडीतून सोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:00 IST

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याने पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस रिट’ याचिका दाखल केली होती

पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याने पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस रिट’ याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत शेलार याला कोठडीतून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

शरद मोहोळचा ५ जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेसह एकूण १८ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात पुण्यातील विशेष न्यायालयात १७५० पानांच्या दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे मोहोळच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर केले नसल्याचा दावा विठ्ठल शेलारने करत उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस रिट’ याचिका सादर केली. मोहोळच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शेलारला पनवेल येथून अटक केली. मात्र, त्याला तिसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर केले. आरोपीला अटक करताना त्याचा आधार व त्यामागची कारणेही दिली नव्हती. त्यामुळे ही अटक बेकायदा असल्याचा युक्तिवाद शेलारच्यावतीने वरिष्ठ वकील मनोज मोहिते आणि ॲड. दादासाहेब भोईटे यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने विठ्ठल शेलार याची अटक बेकायदा ठरवून त्याला सोडून देण्याचा आदेश दिला.खून 

‘हेबियस कॉर्पस रिट’ म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीला अटक केली असल्यास तिला न्यायालयात हजर करून अटकेचे कारण आणि त्याची कायदेशीरता तपासली जाते. जर अटक बेकायदेशीर आढळली, तर न्यायालय त्या व्यक्तीची तत्काळ सुटका करण्याचा आदेश देते. ही याचिका नागरिकांना मनमानी आणि बेकायदेशीर अटकेपासून वाचवते आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करते. ही याचिका पोलिस, सरकारी अधिकारी किंवा खासगी व्यक्ती (ज्यांनी दुसऱ्याला ताब्यात घेतले आहे) त्यांच्याविरुद्ध दाखल केली जाऊ शकते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vitthal Shelar's Arrest in Mohol Murder Case Illegal: Court Orders Release

Web Summary : Bombay High Court deemed Vitthal Shelar's arrest in the Sharad Mohol murder case illegal. Shelar, accused of being a key conspirator, was ordered released due to unlawful arrest procedures. The court upheld his habeas corpus petition.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMumbai High Courtमुंबई हायकोर्टCrime Newsगुन्हेगारीArrestअटकkothrudकोथरूड