शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मान्सूनमध्ये पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:18 IST

या मान्सूनमध्ये पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना तुम्ही आवर्जुन भेट देऊ शकता.

पुणे : मान्सून सुरु झाला की विविध ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅन केले जातात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक नवनवीन ठिकाणांचा शाेध घेत असतात. मान्सूनमध्ये डाेंगर हिरवी चादर पांघरत असल्याने ते दृष्य प्रत्येकाच्या ह्रद्याचा ठाव घेत असते. तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून काेसळणारे धबधबे प्रत्येकाच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले. या किल्ल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवाची, महाराजांच्या पराक्रमाची आपल्याला माहिती मिळते. त्याचबराेबर मान्सून मध्ये या किल्ल्यांवरुन दिसणारं दृश्य नयनरम्य असतं. त्यामुळे या मान्सूनमध्ये तुम्ही पुण्याजवळच्या या पाच किल्ल्यांना नक्कीच भेट देऊ शकता. 

1) सिंहगडगड आला पण सिंह गेला हे शिवाजी महाराजांचे उद्गार आपल्या सर्वांनाच माहित आहेत. मुघलांच्या ताब्यातून सिंहगड मिळवताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. शिवाजी महाराजांचा सिंहासारखा लढवय्या मावळा या लढाईत मारला गेल्याने त्याच्या पराक्रमाची ओळख म्हणून पूर्वीच्या काेंढाणा किल्ल्याचे सिंहगड असे नामकरण करण्यात आले. पुण्यापासून अवघ्या 25 ते 30 किलाेमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावरुन नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सिंहगडावरुन संपूर्ण पुणे शहर आपल्या दृष्टीस पडते. सिंहगडाच्या दरवाज्यापर्यंत तुम्ही गाडीवर देखील जाऊ शकता. किंवा ट्रेकिंगचा ऑप्शन आहेच. सिंहगडावर गेल्यावर तिकडची भजी आणि पिठलं खायला विसरु नका. 

2) राजमाची किल्लापुण्यापासून 50 ते 60 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे. लाेणावळा आणि खंडाळ्याच्या मध्ये असणारा राजमाची किल्ला नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारा निसर्ग स्वर्गाची अनुभूती देऊन जाताे. गडावरील लेण्या आणि मंदिर तुम्हाला इतिहासात घेऊन जातात. ट्रेकर्सचा हा आवडता किल्ला आहे. अनेकजण किल्ल्यावर कॅपींग सुद्धा करतात. त्यामुळे पावसाळ्यात कुठे बाहेर जायचा विचार करत असाल तर राजमाची किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे. 

3) शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे शिवप्रेमींच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळताे. गाडीने आपण किल्ल्यावर जाऊ शकताे. पावसाळ्यात गडावरुन दिसणारं दृश्य खूप सुंदर असते. पुण्यापासून 70 ते 75 किलाेमीटरवर हा किल्ला आहे. त्यामुळे तुम्ही टु व्हिलरवर सुद्धा जाऊ शकता. 

4) रायगड शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगड बांधला. समुद्र सपाटीपासून 820 मीटर इतक्या उंचीवर रायगड आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड ओळखला जाताे. रायगडावरुन स्वराज्यावर नजर ठेवली जात असे. गडावर महाराजांची समाधी पाहायला मिळते.  त्याचबराेबर गडावर जगदीश्वराचे मंदीर व वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा आहे. स्वराज्य द्राेह करणाऱ्याला याच गडावरील टकमक टाेकावरुन दरीत फेकण्यात येई. हिरकणीची कथा आपण सगळेच जाणताे. जाे बुरुज उतरुन हिरकणी  गेली हाेती ताे बुरुज सुद्धा आपल्याला या गडावर पाहायला मिळताे. रायगडावर माेठी बाजारपेठ हाेती. त्या बाजारपेठेचे अवशेष अजूनही गडावर आहेत. राेपवेच्या माध्यमातून गडावर जाता येते. त्याचबराेबर गडावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. राजगड ते रायगड असा ट्रेक अनेक ट्रेकर्स करतात. महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला हाेता. पुण्यापासून 85 ते 90 किलाेमीटरवर हा किल्ला आहे. 

5) राजगड गरुडाने पंख विस्तारल्यावर जसा आकार दिसताे, तशा आकाराचा हा किल्ला आहे. राजगड हा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जाताे. किल्ल्याच्या तिन्ही माच्या पाहण्यासारख्या आहेत. गडाचा हत्ती बुरुज देखील प्रेक्षणीय आहे. किल्ल्यावरुन सुर्याेदय सुंदर दिसताे. किल्ला चढून जावा लागताे. पावसाळ्यात किल्लायावरचे दृश्य पाहण्यासारखे असते. पुण्यापासून 60 ते 65 किलाेमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 

टॅग्स :PuneपुणेFortगडenvironmentवातावरणhistoryइतिहास