विमाननगरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:18+5:302021-03-04T04:21:18+5:30

पुणे : विमाननगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करत एकाला अटक केली. लीलाधर परिप्रसाद ...

Vimannagar prostitution exposed | विमाननगरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

विमाननगरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

पुणे : विमाननगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करत एकाला अटक केली. लीलाधर परिप्रसाद भारती ऊर्फ निखिल (वय २९, रा. वडगावशेरी, मूळ आसाम) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा अन्य साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी, येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला साकोरेनगर विमानगर येथे दोन व्यक्ती पैशाच्या आमिषाने तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने साध्या वेशात बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता, वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. पीडित तरुणींना पैशाचे आमिष दाखवून दोघे वेश्याव्यवसाय करून घेत होते.

Web Title: Vimannagar prostitution exposed