सासवड येथे गावठी पिस्तूल, २ काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST2021-01-22T04:11:45+5:302021-01-22T04:11:45+5:30

या प्रकरणी गौरव उर्फ मायभाई कामथे (वय २२, रा. खळद गाव) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या ...

Village pistol, 2 cartridges seized at Saswad | सासवड येथे गावठी पिस्तूल, २ काडतुसे जप्त

सासवड येथे गावठी पिस्तूल, २ काडतुसे जप्त

या प्रकरणी गौरव उर्फ मायभाई कामथे (वय २२, रा. खळद गाव) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील जेजुरी नाका येथे कामथे हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे सासवड पोलिसांना बातमीदारांमार्फत समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून गौरव कामथेला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, व एक मोटार असा ८५ हजार २०० रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, विजय कांचन, धीरज जाधव, अभिजित एकशिंगे, दगडू वीरकर यांनी केली.

Web Title: Village pistol, 2 cartridges seized at Saswad