शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 11:20 IST

कोल्हापूर, मुलुंड आणि कोथरूड असे तीन पर्याय चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले होते. त्यांनी कोथरूडची निवड केली आहे.

ठळक मुद्देपाटील यांची उमेदवारी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांच्या वर्णी घाव करणारी कोथरूड मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवाडी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट याना सर्वाधिक लाखाहून अधिक मताधिक्य देणाºया कोथरूड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. पण बाहेरील उमेदवार कोथरूडकरं स्वीकारणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात सुरक्षित व हक्काचा विधानसभा मतदार संघ म्हणून कोथरूड मतदार संघ आहे. अशा विजयश्री देणाऱ्या मतदार संघात ऐनवेळी या पक्षाने महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन सवार्नाच आश्चर्यचा धक्का दिला आहे. पाटील यांची ही उमेदवारी मात्र येथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व प्रबळ दावेदार असलेले इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वर्णी घाव करणारी ठरली आहे.  या मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच बाहेरच विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील उमेदवार आल्याने कोथरूडकर त्यांचा स्वीकार करून त्यांचा पदरात भरघोस दान टाकतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचा परंपरागत मतदार मोठ्या संख्येने असलेल्या कोथरूड मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवाडी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान करून ही जागा मित्र पक्षाला देऊ केली. पण हा मित्र पक्ष कोण हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यातच विद्यमान आमदार कुलकर्णी तथा नवीन चेहरा म्हणून सर्वात अग्रभागी असलेल्या मोहोळ यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना हा बाहेरचा उमेदवार रुचणार का ? हा मोठा प्रश्न आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्रिमंडळतील प्रमुख मंत्री म्हणून या दोघांनाही त्यांचा स्वीकार करावाच लागेल, परंतु भाजपला मिळणारे मताधिक्य पाटील यांच्या वाट्याला येईल का हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान काँगेस आघाडीने अद्याप येथील उमेदवार जाहीर केला नसला तरी पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता नवीन बांधणी होऊ सक्तते का याची ही चाचपणी होणार हे नक्की. तर दुसरीकडे मनसे ही येथे तगडा उमेदवार देऊ शकते. मोहोळ यांच्या नावाच्या चर्चेत विद्यमान मनसेच्या वाटेवर अशी चर्चाही या मताफर संघ आत सुरू होती. त्यामुळे कोथरूड भाजपचाच पण उमेदवार कोण यापेक्षा आता विजय कोथरूडकरांचा की बाहेरच्या उमेदवाराचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.........कोथरूड २०१४ (विधानसभा) एकूण मतदार :     १, ९७, ३३८मेधा कुलकर्णी :     १,००,९४१ (भाजप) चंद्रकांत मोकाटे :     ३६, २७९ (शिवसेना) बाबूराव चांदेरे :     २८, १७९ (राष्टÑवादी) किशोर शिंदे :     २१, ३९२ (मनसे) उमेश खंदारे :     ६, ७१३  (कॉँग्रेस)

पाटील यांनी थेट जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान राष्टÑवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार देत असतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांना पवारांच्या जिल्ह्यातील मतदारसंघात उतरवून भाजपने मोठी चाल खेळली आहे. त्यामुळे येथील लढत हायप्रोफाईल होणार आहे. ४स्वत: पवार येथे लक्ष घालतीलच, पण त्याचबरोबर भाजपमधील अंतर्गत समीकरणे पाटील यांचे पुण्यातील स्थान स्वीकारतील का हा प्रश्न आहे. कसबा मतदारसंघात पाटील लढणार अशी चर्चा होती. पण याच समीकरणाने त्यांनी तेथून लढण्यास नकार दिला असल्याचीही चर्चा आहे.  ४ते कोथरूडमध्येही घडविण्याचा प्रयत्नच केला जाणार नाही, असे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे पाटील यांची कसोटी लागणार आहे हे निश्चित.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटील