VIDEO : धायरीत मद्यधुंद डंपर चालकाचा थरार...! लोखंडी दुभाजक तोडून ज्यूसच्या हातगाडीसह रिक्षाला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 22:31 IST2022-01-11T22:29:46+5:302022-01-11T22:31:26+5:30
धायरी फाट्याकडून भरधाव वेगाने येणारा एक डंपर मुक्ताई गार्डन जवळ लोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्यांमध्ये शिरला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या रिक्षालाही धडकला.

VIDEO : धायरीत मद्यधुंद डंपर चालकाचा थरार...! लोखंडी दुभाजक तोडून ज्यूसच्या हातगाडीसह रिक्षाला धडक
धायरी - मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर लोखंडी दुभाजक तोडून रिक्षासह ज्यूस सेंटरच्या हातगाडीवर जाऊ धडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर रिक्षाचे व ज्यूस सेंटर हातगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना धायरी येथील मुक्ताई गार्डनजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत डंपर चालक अविनाश कोंडीबा खंदारे ( वय: २५ वर्षे, रा. कात्रज, पुणे) यास सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, धायरी फाट्याकडून भरधाव वेगाने येणारा एक डंपर मुक्ताई गार्डन जवळ लोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्यांमध्ये शिरला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या रिक्षालाही धडकला. या अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात हातगाड्या व टपऱ्याचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी केंचाप्पा जनवाड, मनोज राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकास ताब्यात घेतले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
धायरीत मद्यधुंद डंपर चालकाचा थरार...! लोखंडी दुभाजक तोडून ज्यूस सेंटरच्या हातगाडीसह रिक्षाला धडक...#dumperdriver#accident#accidentinpune#Accidentindhayaripic.twitter.com/ruBAfHsVcy
— Lokmat (@lokmat) January 11, 2022
कधी संपणार अपघातांची मालिका....? पाच दिवसांपूर्वी टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू -
धायरी येथील गणेश नगर परिसरातील मुक्ताई गार्डनजवळ पाच दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकरखाली चिरडून मृत्यू झाला होता. तर मंगळवारी त्याच परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यधुंद डंपर चालकाचा थरार धायरीकरानी बघितला.
परिसरात डंपर चालक व टँकर चालक आपली वाहने बेदरकारपणे चालवतात, याबाबत लोकमतने वृत प्रसिध्द केले होते.मात्र तरीही वाहतूक पोलिसांच्या वतीने या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र तसेच वेगाची मर्यादा तपासली जात नाही.