शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे विश्वासू बाबुराव चांदेरेंच्या दादागिरीचे व्हिडिओ व्हायरल; कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:45 IST

बाबुराव चांदेरेंची मारहाणीची पहिली वेळ नाही. २०२४ च्या जुलै महिन्यात बाणेरमध्ये...

- किरण शिंदे पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू आणि पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे मारहाण आणि दादागिरीचे व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत चांदेरे एका बांधकाम व्यावसायिकाला उचलून रस्त्यावर आदळताना दिसत आहेत. ड्रेनेज लाईन टाकण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.दुसऱ्या प्रकरणातही मारहाण ही बाबुराव चांदेरेंची मारहाणीची पहिली वेळ नाही. २०२४ च्या जुलै महिन्यात बाणेरमध्ये त्यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केली होती. वाहतुकीस अडथळा ठरल्याचा आरोप करत त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणातही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.

तिसऱ्या व्हिडिओतही दमदाटीचा प्रकार अलीकडील आणखी एका व्हिडिओत बाणेर परिसरातील खाऊ गल्लीत चांदेरे स्थानिकांना धमकावताना आणि एका वाहनचालकाला दमदाटी करताना दिसले. या सर्व घटना पाहता, चांदेरेंच्या दादागिरीचे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चांदेरेंना याबद्दल जाब विचारला जाईल. असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची कारवाई महत्त्वाची बाबुराव चांदेरेंवर आता पक्ष स्तरावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनांमुळे चांदेरेंची प्रतिमा आणि पक्षाची शिस्त या दोन्हींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAjit Pawarअजित पवार