शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पुणेकरांनी जपला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा

By admin | Updated: January 23, 2017 09:16 IST

लक्ष्मण मोरे / पुणे ‘व्यंगचित्रकारांनी भल्याभल्या हुकूमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. १०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. व्यंगचित्रकाराची ...

लक्ष्मण मोरे / पुणे‘व्यंगचित्रकारांनी भल्याभल्या हुकूमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. १०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. व्यंगचित्रकाराची एक नजर असते. लोक वृत्तपत्रांच्या ओळी वाचतात आणि व्यंगचित्रकार ओळींमधल वाचतो,’ असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. मराठी मनाचा मानबिंदू आणि शिवसेनाप्रमुख त्यांची एक प्रतिमा असली तरी एक व्यंगचित्रकार म्हणूनही बाळासाहेबांची स्वतंत्र ओळख आहे. पुणे महापालिकेने त्यांच्या नावाने उभारलेल्या व्यंगचित्र कलादालनाला प्रतिसाद मिळत आहे.बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर महापालिकेने त्यांच्या नावाने व्यंगचित्र कलादालन उभे केले. त्याचे उद्घाटन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आले होते. या व्यंगचित्र दालनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून चितारलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे मांडण्यात आलेली आहेत. स. का. पाटील यांच्यावर काढलेले व्यंगचित्र छापू नका, असे संपादकांनी सांगितल्यामुळे त्यांनी फ्री प्रेसच्या नोकरीचा राजीनामा दिला. विन्स्टन चर्चिल यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरित्रात व्यंगचित्रे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये जी तीन व्यंगचित्रे भारतातून देण्यात आली ती सर्व व्यंगचित्रे बाळासाहेबांनी रेखाटलेली होती. पुढे त्यांनी नोकरी सोडून आॅगस्ट, इ. स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) सुरू केले. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी भल्याभल्यांना जेरीस आणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनाप्रमुख पदापर्यंतचा प्रवास मोठा संघर्षपूर्ण आहे. त्यांचा १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरेंचा पुण्याशी कायमच भावनिक ॠणानुबंध राहिला आहे. पुण्यामध्येही त्यांना राजकीय आणि वैयक्तिक मित्र मोठ्या प्रमाणावर लाभले. त्यांचा जन्मच पुण्यात झालेला असल्यामुळे पुण्याशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती. ते पुण्यात आले, की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीमधील घरी उतरत असत. अशाच अनेक सुहृदांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कलाप्रेमी पुणेकरांना बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे पाहता यावीत, याकरिता महापालिकेने सारसबागेजवळ त्यांच्या नावाने कलादालन उभे केले आहे. या कलादालनामध्ये अधूनमधून कार्यक्रम होत असतात. दररोज तुरळक प्रमाणात काही नागरिक भेट देतात. मात्र, एक वर्षात महापालिकेने या दालनाकडे प्रेक्षक आकर्षित होतील, यासाठी फारच तुटपुंज्या उपाययोजना केल्या आहेत.

https://www.dailymotion.com/video/x844p3w