पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:37 PM2020-06-02T15:37:34+5:302020-06-02T15:49:06+5:30

गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली..

Vehicles Theft was started in Pune city | पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी ३ वाहने लंपास : ५ महिन्यात ८२९ गुन्हे कमीगेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या ५ महिन्यात ३२४ वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

पुणे : मॉर्चपासून लॉकडाऊन सुरु असल्याने शहरातील गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे. मात्र, गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली. त्याचबरोबर वाहन चोरटे सक्रीय झाले आहेत. सोमवारी एकाच दिवशी शहरात तीन वाहनचोऱ्यांची नोंद झाली आहे़. एप्रिल महिन्यात ६ आणि मे महिन्यात १३ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट झाली आहे.
ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेली आहे. सकाळनगर येथील गेट नं१ येथून चोरट्यांनी एक मोटारसायकल चोरुन नेली. वडगाव शेरी येथील शिवामृत दुग्धालय डेअरीसमोरुन मोटारसायकल चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल आहेत. शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात होती. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांना आळा बसला होता. एप्रिल महिन्यात संपूर्ण शहरात केवळ ७७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, ४ मेपासून लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली. त्यामुळे काही व्यवहार सुरु झाले. त्याचवेळी दारु दुकाने सुरु करण्यात आली. त्याचा परिणाम शहरातील किरकोळ मारामारीच्या गुन्ह्यात वाढ झाली. खुनाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मे महिन्यात शहरात ८ खुनाच्या घटना घडल्या. तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांमध्ये ९ ने वाढ झाली आहे. मे महिन्यात २९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या काळात अशा अनेक घटना घडल्या.सर्वसाधारण परिस्थितीत त्याचे गुन्हे दाखल केले गेले असते़. मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे दाखल केले गेले नाहीत. नाहीतर मे महिन्यातील गुन्ह्यांची संख्या आणखी वाढली असती. विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मे १०९ मध्ये १०९ गुन्हे दाखल होते. त्या तुलनेत यंदा मे २०२० अखेर १२५ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली प्रामुख्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे महिन्यात भाग ६ चे एकूण ४ हजार २४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत २० हजार २०९ गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्या तुलनेत मे २०१९ अखेर भाग ६ चे ३ हजार ८६८ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
..............
प्राणघातक अपघातात ४ ने घट

गेल्या २ महिन्यांपासून रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती. त्यामुळे शहरातील अपघातांच्या संख्येत घट झाली असली तरी प्राणघातक अपघातात फारशी घट झाली आहे.  मे २०१९ अखेर ६८ प्राणघातक अपघातांची नोंद करण्यात आली होती. यंदा मे २०२० अखेर ६४ प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे.

गेल्या ५ महिन्यांमधील शहरातील गुन्ह्यांचा तुलनात्मक आलेख

                                २० मार्च           २० एप्रिल    २० मे         मे अखेर
खुन                             १५                 १८              २६              २७
खुनाचा प्रयत्न              २६                २७              ३६्              २७
चेन स्नचिंग                 ८                  ११              १३               १९
मोबाईल चोरी               ९                   ९                १०              ३१
बलात्कार                    ४०                ४४                ४८               ७६
विनयभंग                   १०१              १०७             १२५            १०७
चोरी                           २६६              २७२             २८१             ४१०
वाहन चोरी                  २६६              २७२            २८५              ६०९
प्राणघातक अपघात     ५२                ५४              ६४               ६८
................
एकूण गुन्हे              १८२७             १९०४          २१९४        २९९३
भाग ६ चे गुन्हे          ३८६८            १५९६०       २०२०९       ३८६८

Web Title: Vehicles Theft was started in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.