वडारवाडीत वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:43+5:302021-01-08T04:28:43+5:30

पुणे : वडारवाडी भागात एका व्यावसायिकाकडे दरमहा हप्ता देण्याची मागणी करून टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केल्याची घटना ...

Vehicle vandalism in Vadarwadi | वडारवाडीत वाहनांची तोडफोड

वडारवाडीत वाहनांची तोडफोड

पुणे : वडारवाडी भागात एका व्यावसायिकाकडे दरमहा हप्ता देण्याची मागणी करून टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केल्याची घटना घडली.

याबाबत एका व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा प्रवासासाठी वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास तक्रारदार रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी टोळक्याने त्यांना अडवले. ‘तुझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत. आम्हाला दरमहा हप्ता दे,’ अशी धमकी दिली. त्यानंतर टोळक्याने तक्रारदाराला मारहाण करून त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. टोळक्याने फिर्यादीच्या दोन दुचाकी, रिक्षा, मोटारींच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. टोळक्याने कोयते उगारून परिसरात दहशत निर्माण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उर्किडे तपास करत आहेत.

Web Title: Vehicle vandalism in Vadarwadi