वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:37 IST2025-05-28T17:37:24+5:302025-05-28T17:37:59+5:30
एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, हगवणेंच्या वकिलांचा अजबगजब युक्तिवाद

वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. पाचही आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलंय. न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले.
शिवाजीनगर कोर्टात हगवणे यांच्या वकिलांनी अजब युक्तिवाद केला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा असल्याचे त्यांनी युक्तिवादात सांगितले आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पडले गेले होते. त्यातुन ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असाही वकिलांनी सांगितलं आहे. तर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असं म्हणत अजब युक्तिवाद केल्याचे दिसून येत आहे. तर सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण यांची चौकशी, ५१ तोळे सोने गहाण ठेवल्याची माहिती यावर युक्तिवाद संपवला आहे. या सर्व ऐकून कोर्टाने पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
- आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत.
- फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे.
- आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले आहे. त्याची माहिती घ्यायची आहे.
- आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचा आहे.
हगवणेंचे वकील
- पोलीस कोठडीची गरज नाही.
- गहाण ठेवलेले सोने कुठल्या बँकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगितलेले आहे.
- निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळलं. पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय. - निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही. तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे.
- वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे.
- हगवणेंच्या वकीलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न
- वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातुन तीने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलाय
- एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही.
- आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्हाला चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला छळ करु