Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:19 IST2025-05-22T12:17:53+5:302025-05-22T12:19:23+5:30
Vaishnavi Hagwane Case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
Vaishnavi Hagwane Case ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवी हगवणे हिला १० महिन्यांचे एक मुल आहे. या मुलाचा ताबा घेण्यासाठी काल वैष्णवी हिचे मामा गेले होते. पण, त्यांना ते बाळ दिले नाही. यावेळी त्यांनाच दम भरल्याची माहिती वैष्णीच्या मामांनी दिली.
वैष्णवीचे मामा म्हणाले, परवा राजेंद्र हगवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हगवणे यांनी मला फोन केला. यावेळी त्यांनी तो मुलगा खूप रडत आहे. तुम्ही काहीतरी करा असं सांगितले म्हणून मी घरी सर्वांसोबत चर्चा केली, त्यानंतर आम्ही त्या मुलाला आणायला गेलो. यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला बोलावून घेतले. त्यांनी आम्हाला वारजे येथील एका सोसायटीत घेऊन गेले. या ठिकाणी ते मुल होते. यावेळी आम्ही त्यांना तुम्हीच ते मुल आम्हाला आणून द्या असे सांगितले. ते ठीक आहे म्हणाले. त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावले, त्या मुलाच्या कमरेला रिव्हॉल्वर होती म्हणून आम्ही घाबरलो. त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिले.
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
"तो सारखा त्या रिव्हॉल्वरला हात लावत होता, म्हणून आम्ही घाबरलो. आम्ही बाळासाठी पोलिसांसोबत बोललो. पोलिसांनी आम्हाला कात्रजचा घाट दाखवला. मुल संवेदनशील आहे, ओळखीच्या व्यक्तीशिवाय राहत नाही. ते मुल तिसऱ्याच व्यक्तीजवळ आहे. ते बाळ आम्हाला मिळावे, असंही वैष्णवीचे मामा म्हणाले.
त्या सोसायटीत आज बाळ नाही
दरम्यान, आज त्या सोसायटीत बाळ नसल्याचे समोर आले आहे. वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले की, माझा भाऊ मोहन, माझा मुलगा विराज आणि माझे दाजी उत्तम बहिरट हे तिघेजण बाळाला आणायला गेले होते, आता मला तिथून फोन आला होता. तिथं बाळ दिसत नाही. ते पिरंगुटच्या इकडे असण्याची शक्यता असल्याची माहिती माझ्या भावाने दिली आहे. काल बाळ आणायला गेल्यावर त्याने आम्हाला बंदूक दाखवली होती, त्यानंतर बातम्या आल्या. त्यामुळे तो फरार झाला, जर आम्हाला बाळ नाही मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार, असंही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.