शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:32 IST

आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे.

  पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूंनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाइल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली, तर आरोपींच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर अनेक स्तरातून संताप व्यक्त केला जात असून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.मनोज आखरे आज माध्यमांशी बोलतांना म्हणाले, काल कोर्टात अजब युक्तिवाद केला गेला. त्या बद्दलचा राग सर्वांनामध्ये आहे. मयत पीडितेबाबत ज्या प्रकारे काल वकिलांनी आरोप केले त्यांचा आम्ही निषेध करतो. आरोपींच्या वकिलाकडे कुठलेही शस्त्र उरलेले नाही त्यामुळेच मयत पीडितेच वकिलांकडून चारित्र्यहनन केलं जात आहे. तुम्ही वकील आहात तुम्हाला न्यायाधीशासमोर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मात्र वकिलांना सोशल मीडियावर मयत पीडितेच चारित्र्यहनन करण्याचा अधिकार कोणी दिला. असेही ते म्हणाले. या वकिलांचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहीजे अशी मागणी आम्ही बार कॉन्सिलकडे मागणी करणार  आहोत असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामागे अनेक बाबी आहे. महिला आयोगाचा आणि पोलीस यंत्रणेचा ढिसाळ कारभार या प्रकरणानंतर पुढे आला आहे. महिला आयोग सुद्धा काय काम करते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेड लढत राहील. असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (२७), सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (२७) यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २८) संपली. त्यामुळे पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.नीलेश चव्हाणचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे, तर लता, करिष्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाइलचादेखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजेस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली आहे. त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसाची, तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे