Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 21:05 IST2025-05-28T20:50:40+5:302025-05-28T21:05:41+5:30
Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणील हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅट सापडल्याचा मोठा दावा केला. दरम्यान,आता या दाव्यावर वैष्णवीच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली.
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट आणि काका मोहन कस्पाटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोहन कस्पाटे म्हणाले, आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे. पोलिस योग्य पद्धतींनी तपास करत आहेत. पोलिस तपास करुन निर्णय घेतील. ते जे आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही, हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात. त्याचा मी जाहीर निषेध करत आहे, असंही ते म्हणाले.
"मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे. आम्ही साक्षीदार आहे स्वतः त्यांनी सोनं, गाडी भीक मागून घेतली. हे मागूनच घेतली म्हणजे लग्नाची जी बैठक झाली होती. त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की, चाळीस लाखाची फॉर्च्युनर काय करायची आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे पाच कोटींची कुठली गाडी नाही. ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं, आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी पुन्हा आणलेली आहे, असा दावाही त्यांनी केला.
"त्यांनी केलेल्या आरोपाचा पोलिस योग्य तपास करतील. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी किती शिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही, आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, असंही वैष्णवीचे काका म्हणाले.