Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:38 IST2026-02-14T15:37:32+5:302026-02-14T15:38:24+5:30

Vaishnavi Hagawane Death Case या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Vaishnavi Hagawane Death Case Vaishnavi Hagavane case; Charges framed against 6 accused - mother-in-law, father-in-law, husband, brother-in-law, brother-in-law and Nilesh | Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टात ११ जणांवर तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांना सबळ पुरावे मिळाले होते. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी होते. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापल्यामुळे सर्वांचेच या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आता सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून खटल्याची सुनावणी येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे

राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि इतर सहा जणांचा समावेश होता. आता सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ५८ दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झाले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आत आरोप झाल्यानंतर ही आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली आहे.  

मागील वर्षी जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली. या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीला वेग येणार असून पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Web Title : वैष्णवी हगवणे मृत्यु: मामले में छह आरोपियों पर आरोप तय।

Web Summary : वैष्णवी हगवणे आत्महत्या मामले में पति और ससुराल वालों सहित छह आरोपियों पर आरोप तय किए गए हैं। ट्रायल 23 फरवरी से शुरू होगा। उन पर दहेज हत्या, आत्महत्या के लिए उकसाने और आपराधिक साजिश के आरोप हैं।

Web Title : Vaishnavi Hagawane death: Charges framed against six accused in case.

Web Summary : Charges have been framed against six accused, including the husband and in-laws, in the Vaishnavi Hagawane suicide case. The trial begins February 23rd. They face charges of dowry death, abetment to suicide, and criminal conspiracy.