Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:24 IST2025-05-27T13:23:31+5:302025-05-27T13:24:24+5:30

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

Vaishnavi Hagawane death case Pune netizens slams Sushil Hagawane Over old instagram post | Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

Sushil Hagawane Insta Post: वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान आता वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची एक जुनी पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुशील हगवणे याने सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. इन्स्टाग्रामवर त्यांच्यासाठी एक खास पोस्ट केली होती. "यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणुया....सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य पण उभारू शकतात. सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सुनेसाठी" असं सुशील हगवणे याने म्हटलं होतं.


लोकांनी व्यक्त केला संताप

सुनेसाठी मतदान करण्याचं आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेच्या कुटुंबाने त्यांच्याच घरातील सुनांना प्रचंड त्रास दिला. याच त्रासातून वैष्णवीने आत्महत्या केली. तसेच तिच्या मोठ्या जावेने देखील सासरच्यांकडून छळ झाल्याचं म्हटलं आहे. वैष्णवीच्या दिराची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. ३ मे २०२४ त्याने ही पोस्ट केली होती. मात्र त्याखाली आलेल्या अनेक कमेंट या काही तासांपूर्वीच्या आहेत. लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

"खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे"

"लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण", "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे" असं म्हणत नेटकरी संतापले आहेत. सुशील हगवणेने शेअर केलेल्या फोटोमध्ये  सुनेत्रा पवार आणि रुपाली ठोंबरे पाहायला मिळत आहेत. त्यावरुनही अनेकांनी रुपाली ठोंबरेंवर निशाणा साधला आहे. सुशील आणि राजेंद्र हगवणेचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सुशील हगवणेने त्याच्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता. या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Web Title: Vaishnavi Hagawane death case Pune netizens slams Sushil Hagawane Over old instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.