राज्यात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 08:03 PM2021-03-21T20:03:47+5:302021-03-21T20:30:22+5:30

कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रापर्यंत सरकल्याने जोरदार पाऊस

Unseasonal rains at several places in the state, warning of rain with gale force winds for the next three days | राज्यात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Next
ठळक मुद्देकोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता

पुणे: कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी, गोवामार्ग उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस राज्यातील कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने २४ मार्च रोजी गारपीट आणि वादळी वार्यासह पावसाचा जोर अधिक असल्याची शक्यता आहे.

राज्यात रविवारी सकाळपर्यंत विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद

बुलढाणा १७, वर्धा ८.६, नागपूर३.९, वाशीम ८.६, यवतमाळ ८, परभणी १०, अकोला
५.८, सोलापूर ०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.

विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक पाऊस पडला. कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने कोकणात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, साेलापूर या जिल्ह्यात २२ ते २४ मार्च असे तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात २२ व २३ मार्च रोजी तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यात २२ ते २४ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे. २४ मार्च रोजी वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Unseasonal rains at several places in the state, warning of rain with gale force winds for the next three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.