शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

‘रेरा’कडे नोंदणी नसलेल्या बांधकामांची दस्तनोंदणी थांबणार : राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:10 PM

नोंदणीकृत नसलेला प्लॉट, अपार्टमेंट, इमारत अथवा इमारत प्रकल्पातील स्थावर मालमत्तांची दस्तनोंदणी करता येणार नाही...

ठळक मुद्देअनोंदणीकृत प्रकल्पांची जाहिरात करण्यावरही केली बंदी, बेकायदेशीर कामांना बसणार आळा 

विशाल शिर्के - पुणे : रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅक्ट (रेरा) अंतर्गत नोंदणी केलेली नसल्यास, संबंधित प्रकल्पातील सदनिकांची दस्तनोंदणी यापुढे होणार नाही; तसेच संबंधित प्रकल्पांची कोणत्याही माध्यमातून जाहिरात करण्यास बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांना आळा बसण्यास मदत होणार आहे.  नोंदणी नियम १९६१ च्या नियम ४४ च्या उपनियमामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. रेरा कायद्याला सुसंगत असे बदल मुद्रांक नोंदणी विभागाने केले आहेत. दुय्यम निबंधकांनी दस्तनोंदणी करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, याबाबत नियम ४४ मध्ये उल्लेख आहे. त्यात आता ‘रेरा’कडे नोंदणी नसलेल्या बांधकाम प्रकल्पाबाबत काय दक्षता घ्यावी, याबाबतची सूचना महसूल विभागाने दिली आहे. ‘रेरा’कडे नोंदणी प्रक्रिया सुरू असलेल्या, ज्यांना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नसल्यास अथवा नोंदणी न झालेल्या अथवा नोंदणी न केलेल्या प्रकल्पांनाही हा नियम लागू राहील. नोंदणीकृत नसलेला प्लॉट, अपार्टमेंट, इमारत अथवा इमारत प्रकल्पातील स्थावर मालमत्तांची दस्तनोंदणी करता येणार नाही. नोंदणीकृत नसलेल्या प्रकल्पांची विक्री करणे अथवा विक्रीचे आवाहनही करता येणार नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींद्वारे या प्रकल्पाची दुकाने, गाळे, सदनिका अशा विविध प्रकरच्या मालमत्ता खरेदी करण्याचे आवाहन करता येणार नाही. राज्यातील शहरहद्दीलगतच्या नव्याने विकसित होणाºया उपनगरांतील आणि ग्रामीण भागातील बेकायदेशीर इमारतींना आळा बसण्यास मदत होईल. याबाबत माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीकांत जोशी म्हणाले की, नोंदणीकृत नसलेल्या बांधकाम प्रकल्पांची नोंदणी न करण्याचा स्तुत्य निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील विविध उपनगरे, शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर बांधकामे होत आहे. बांधकामांची अनियंत्रित वाढ होत आहे. या निर्णयामुळे परवाना असलेलेच बांधकाम प्रकल्प राहतील. अशा प्रकल्पांची जाहिरात करता येणार नसल्याने जनतेचीदेखील दिशाभूल होणार नाही. .............नोंदणीकृत नसलेल्या प्रकल्पांची दस्तनोंदणी होणार नसल्याने बेकायदेशीर बांधकामांच्या नोंदी आता बंद होतील. त्यामुळे जे नियमांचे पालन करून नियोजनबद्ध बांधकाम करतात त्यांना या निर्णयाचा फायदा होईल. ग्राहकांनादेखील आपले कायदेशीर घर-दुकान मिळेल. - सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष क्रेडाई

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारbusinessव्यवसाय