शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

अनोखी श्रद्धांजली : मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दशक्रियेत केले हेल्मेटचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:01 PM

गाडी चालविताना दिग्विजयच्या डोक्यात हेल्मेट असते, तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता...

ठळक मुद्दे: चाकण लायन्स क्लबचा पुढाकार

आंबेठाण : बापाच्या खांद्यावर तरुण तुर्क मुलाची तिरडी यापेक्षा मोठे दु:ख जगात कुठले नसेल. मात्र ज्या बापाच्या वाटेला हे दु:ख आले तसे दु:ख इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून मेदनकरवाडीतील किरण मेदनकर यांनी मुलाच्या दशक्रिया विधीला हेल्मेटचे वाटप केले. मेदनकरवाडी (ता. खेड) येथील बावीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाच्या अपघातीमृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी चाकण लायन्स क्लबच्या माध्यमातून संबंधित युवकाच्या दशक्रियेनिमित्त उपस्थित नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. या भागात हा अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिग्विजय किरण मेदनकर ( वय २२ वर्षे ) असे अपघातातमृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दिग्विजय हा पुणे येथे बी. ई. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात त्याचा दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होवून मृत्यू झाला होता. गाडी चालविताना दिग्विजय याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे अशी वेळ अन्य कोणावरही येवू नये, यासाठी मेदनकर यांनी चाकण लायन्स क्लबच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेटचे वाटप केले. चाकण लायन्स क्लबचे अध्यक्ष मधुकर सातव, सचिव बाळासाहेब मुटके, चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन गोरे, नगरसेवक धीरज मुटके आदींच्या हस्ते या हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मेदनकरवाडीचे माजी सरपंच शांताराम मेदनकर, माजी उपसरपंच नंदराम भुजबळ, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग गोरे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा प्रमुख ह.भ.प. मुक्ताजी नाणेकर, डॉ. रमेश जाधव, सतीश प-हाड, शंकरराव डोंगरे, डॉ. विलास मांजरे, लक्ष्मण नाणेकर, किरण मेदनकर, गणेश लांडे, प्रकाश मांजरे, प्रकाश मुटके, दिलीप परदेशी आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------दिग्विजय हा आमचा जीव की प्राण होता. त्याच्या अपघाती मृत्यूने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुचाकी चालविताना त्याच्या डोक्यात हेल्मेट असते, तर हा प्रसंग त्याच्यावर ओढवला नसता. ही वेळ अन्य कोणावरही येऊ नये, यासाठी आम्ही हेल्मेट वाटप केले आहे. - किरण मेदनकर,  मृत तरुणाचे वडील  

टॅग्स :KhedखेडAccidentअपघातDeathमृत्यू