पुरंदरच्या पाडेगावात गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:07 IST2023-03-21T15:07:00+5:302023-03-21T15:07:08+5:30
हत्या कि आत्महत्या याचा पोलीस तपास सुरु

पुरंदरच्या पाडेगावात गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह
नीरा : नीरा नदीच्या पलीकडे पाडेगाव येथील समता आश्रम शाळेमागील जून्या इरागेशन काॅलनीतील एका पडीक खोलीत अनोळखी इसमाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत रविवारी दूपारी ( दि.१९) आढळून आला. या व्यक्तीने निर्जनस्थळी आत्महत्या केली किंवा त्याची हत्या झाली आहे याची चर्चा गेली दोन दिवस नीरा परिसरात आहे. लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष डोईफोडे रा. पाडेगाव यांनी फिर्याद दिली आहे.
नीरा नदीच्या काठावरील समता आश्रम शाळेच्या मागे असलेल्या पाठबंधारे विभागाच्या पडक्या खोलीत एक मृतदेह आढळून आला आहे. ३५ ते ४० वयाचा पुरुषाचा मफलरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. उंची ५.६ फुट, पांढऱ्या रंगाचा हाफ भायांचा शर्ट, गडद निळ्या रंगाची साधी फिटिंग पँन्ट, तसेच सुदृढ शरीर असल्याचे वर्णन पोलिसांनी सांगितले आहे. लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.