शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळाबाबत उदासीनच

By admin | Updated: April 11, 2015 05:17 IST

बेस्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत परिसरात वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

सुवर्णा नवले, पिंपरीबेस्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत परिसरात वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. कर्मचारी, नगरसदस्य, अधिकारी वर्गापर्यंत चारचाकी व दुचाकीने पालिकेचा सर्व परिसर वाहनांनीच व्यापला जात आहे. महापालिकेत दहा हजारांच्या वर वाहनांची दैनंदिन ये-जा होत आहे. कित्येक निविदा भरूनही अद्यापपर्यंत पालिकेच्या वाहनांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचे लोकमत पाहणीत समोर आले आहे.सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेदिवशी वाहनतळाची समस्या तीव्रतेने जाणवत आहे. दुचाकी व चारचाकीसाठी वाहनतळ अपुरे पडत आहे. वाहने लावण्यावरून कार्यकर्ते पुरेशा जागेअभावी सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची अरेरावी सहन करावी लागत आहे. पार्किंगचे काम नसतानाही या कामाचा त्रास सुरक्षारक्षकांना होत आहे. महापालिकेकडे वाहनतळासाठी पुरेशी जागा कधी उपलब्ध होणार, हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.महापालिकेच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी अधिकाऱ्यांकरिता मुंबई-पुणे महामार्गाच्या डाव्या बाजूला ५ हजार चौरस फूट जागा महापालिकेसमोर वाहनतळ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यास पदाधिकारी अनुत्साही असल्याचे दिसत आहे. ही जागा वापराविना पडून आहे. याकरिता ग्रेड सेपरेटरवरून पालिकेत वाहनांतळकरिता पूल असणे गरजेचे आहे. महापालिकेला चारही बाजूंनी वेढले वाहनांनीमुंबई-पुणे महामार्गालगत रस्तारुंदीकरणाचे, बीआरटीएसचे काम सुरू आहे. यामुळे दुचाकी लावण्यासाठी असणारी जागा कमी पडत आहे. महापालिका प्रवेशद्वार ते बाहेर पडण्याच्या मार्गापर्यंत वाहनांची कोंडी दिसून येत आहे. महापालिकेला चारही बाजूंनी वाहनांनी वेढलेले आहे. गाड्या अस्ताव्यस्त लावल्यामुळे याचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. वाहने खचाखच लावली जातात. यामुळे वाहनांचे काही भाग निखळले जात आहेत.