दुर्दैवी घटना! घरातील सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावरून गेले पीएमपीचे चाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:19 IST2023-09-01T16:18:52+5:302023-09-01T16:19:25+5:30
तरुण घरातले सामान आणण्यासाठी जात होता, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष बसचालकाने तरुणाला धडक दिली

दुर्दैवी घटना! घरातील सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावरून गेले पीएमपीचे चाक
पिंपरी : घरातील सामान आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला पीएमपीएमएलच्या बसने धडक दिली. या अपघातामध्ये तरुण खाली पडून त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विजय चंद्रसेवर सिंग (वय १९, शरदनगर, चिखली) असे आहे. ही घटना गुरुवारी (दि.३१) सकाळी साडेआठच्या दरम्यान साने चौक, चिखली घडली. या प्रकरणी संग्राम धोंडीराम अर्जुने (२३, रा.चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी पीएमपीचालक सुनिल सुभाष दुधाळकर (२७, रा.रुपीनगर, तळवडे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा घरात घरगुती सामान आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरून चालला होता. साने चौकातील रस्त्यावर पीएमपी चालक संशयित आरोपी सुनिल यांनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत बस चालवली. तसेच डाव्या बाजुने विजय यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये विजय दुचाकीवरून खाली पडले. त्यावेळी पीएमपी बसचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून जाऊन गंभीर जखमी होत त्यांचा मृत्यू झाला.