लाडक्या बहिणीसाठी अतूट जिव्हाळा! भावाचे किडनीदान अन् बहिणीला मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:35 AM2023-08-30T09:35:32+5:302023-08-30T09:37:25+5:30

बहीण डायलिसीसीवर असताना भावाचे लग्न झाले नसतानाही स्वत:चा काेणताही विचार न करता किडनी देण्याचा कठाेर निर्णय

Unbreakable love for a beloved sister Brother got kidney donation and sister got life donation | लाडक्या बहिणीसाठी अतूट जिव्हाळा! भावाचे किडनीदान अन् बहिणीला मिळाले जीवदान

लाडक्या बहिणीसाठी अतूट जिव्हाळा! भावाचे किडनीदान अन् बहिणीला मिळाले जीवदान

googlenewsNext

पुणे : रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. बुधवारी (दि. ३०) हा उत्सव साजरा हाेत आहे. याच दिवशी बहीण लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊदेखील बहिणीसाठी वेळप्रसंगी काेणताही त्याग करण्यासाठी तयार हाेताे. असेच एक उदाहरण पुण्यातील बहीण-भावाचे आहे. किडनी निकामी झालेल्या बहिणीला किडनीचे दान करून भाऊरायाने तिचा जीव वाचवला. रक्षाबंधनानिमित्त बहीण-भावाची अतूट जिव्हाळ्याची ही गाेष्ट आहे.

एज्युकेशन कन्सल्टंट असलेले स्मित विनायकराव रणनवरे (वय ३७, रा. बाणेर) यांनी त्यांची माेठी बहीण पारूल वैभव पिसाळ (वय ४५, रा. पद्मावती) यांना स्वत:ची किडनी दान केली. जहांगीर हाॅस्पिटलमध्ये २३ जुलै २०१८ राेजी ही किडनी पारूल यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रत्याराेपित करण्यात आली. तेव्हापासून दाेघांचीही तब्येत अगदी ठणठणीत आहे. किडनी प्रत्याराेपणानंतर त्यांच्यासाठी आजचे हे सहावे रक्षाबंधन आहे.

पारूल या गृहिणी आहेत. त्यांचे २०१७ ला वजन कमी व्हायला लागले. तेव्हा त्यांचे पती वैभव पिसाळ यांनी संपूर्ण तपासण्या केल्या. या रिपाेर्टमध्ये त्यांचे हिमाेग्लाेबिन कमी झाले हाेते. तर लघवीतील क्रियाटिनीन या घटकाचे प्रमाण ३.५ वर (जे १ च्या आत हवे) गेले हाेते. त्यांनी सातारा रस्त्यावरील खासगी रुग्णालयात मूत्रराेगतज्ज्ञ डाॅ. सुनील जावळे यांना दाखवले. आणखी तपासण्या केल्यावर पारूल यांना ‘क्राॅनिक किडनी डिसिज’ असल्याचे निदान झाले. त्यावर सुरुवातीला पाच ते सहा महिने गाेळ्या घेतल्या; परंतु, क्रियाटिनीन ८ ते ९ इतके वाढले. डायलिसिस मागे लागले. डाॅक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा पर्याय समाेर ठेवला.

किडनी काेण देणार, असा शाेध सुरू झाला तेव्हा स्मित स्वत:हून पुढे आला आणि बहिणीसाठी काेणताही विचार न करता किडनी द्यायला तयार झाला. जहांगीर हाॅस्पिटलमध्ये डाॅ. सुनील जावळे, डाॅ. दीपक किरपेकर यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. येथील प्रत्यारोपण समन्वयक मनाेज गाडेकर यांनी समुपदेशन केले. यासाठी पाच ते सहा लाख खर्च झाला. आता दाेघांचीही तब्येत ठीक आहे, अशी माहिती पारूल यांचे पती वैभव पिसाळ यांनी दिली.

किडनी देण्याचा कठाेर निर्णय 

आम्ही चाैघी माेठ्या बहिणी असून स्मित हा आमचा सर्वांत लहान आणि एकुलता एक भाऊ आहे. काही दिवस मी डायलिसिसवर हाेते. हे पाहून माझ्यापेक्षा लहान असताना, त्याचे लग्नही झालेले नसताना स्वत:चा काेणताही विचार न करता त्याने मला किडनी देण्याचा कठाेर निर्णय घेतला. स्मित प्रत्येक रक्षाबंधनाला राखी बांधायला येताे. - पारूल पिसाळ, गृहिणी, पद्मावती.

Web Title: Unbreakable love for a beloved sister Brother got kidney donation and sister got life donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.