"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट

Virat Kohli Vijay Mallya, IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR: आज बंगळुरू विरूद्ध राजस्थान सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:54 PM2024-05-22T15:54:32+5:302024-05-22T15:55:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR Vijay Mallya tells about bidding for franchise and Virat Kohli  | "विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट

"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Vijay Mallya, IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR: सलग ६ सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्ले-ऑफ्सची फेरी गाठली. आज RCBचा सामना राजस्थानच्या संघाशी होणार आहे. राजस्थानच्या संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पण पहिल्या पर्वातील विजेतेपद वगळता राजस्थानना पुन्हा कप उंचावता आलेला नाही. RCB ही आपल्या पहिल्या IPL विजेतेपदाची वाट पाहत आहे. त्यामुळे आज एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघांची कसोटी लागणार आहे. या सामन्यातील विजेता संघाला क्वालिफायर-2 मध्ये हैदराबादशी खेळायचे आहे तर पराभूत संघाचा स्पर्धेतील प्रवास संपणार आहे. याच दरम्यान RCB आणि विराट कोहलीसाठी कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याने खास ट्विट केले आहे.

एलिमिनेटरमध्ये कोणता संघ जिंकणार हे अहमदाबादमध्ये ठरणार आहे. त्याआधी प्रत्येकजण आपापल्या परीने दावे करत आहे. असाच दावा विजय मल्ल्याने केला आहे. 2008 मध्ये विजय मल्ल्याने ही फ्रेंचायझी विकत घेतली होती. त्याबद्दल आज त्याने ट्विट केले. "जेव्हा मी RCB संघसाठी आणि विराट कोहली साठी बोली लावत होतो त्यावेळी माझा आतला आवाज मला सांगत होता की यापेक्षा जास्त चांगले पर्याय असूच शकत नाहीत. आज देखील माझा आंतरात्मा मला सांगतोय की यंदा RCB ला IPL विजेतेपद मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे. ऑल द बेस्ट!" असे ट्विट मल्ल्याने केले.

दरम्यान, RCB च्या संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात CSK ला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे त्यांना Top 4 मध्ये स्थान मिळवता आले. पहिल्या 8 पैकी 7 सामन्यात RCBने पराभवाचा सामना केला होता. पण त्यानंतर सलग ६ सामने जिंकून RCB ने चमत्कार करून दाखवला. राजस्थानच्या संघाने मात्र स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखत दमदार कामगिरी केली. त्यांनी 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 17 गुण मिळवले आणि SRH ची बरोबरी केली. पण नेट रनरेटमुळे राजस्थानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Web Title: IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR Vijay Mallya tells about bidding for franchise and Virat Kohli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.