शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील पेशवेकालीन तलावात अनधिकृत उत्खनन

By admin | Updated: June 29, 2015 23:48 IST

येथील जुनी जेजुरी परिसरातील पेशवेकालीन ऐतिहासिक पेशवे तलावात अनधिकृत मुरूम व माती उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.

जेजुरी : येथील जुनी जेजुरी परिसरातील पेशवेकालीन ऐतिहासिक पेशवे तलावात अनधिकृत मुरूम व माती उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाकडून आज कारवाई करण्यात आली. सादर वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मंडलाधिकारी संजय बडदे यांनी दिली. या तलावात अनेक दिवसांपासून बेकायदा मुरूम व माती उपसण्यात येत असल्याचा सुगावा महसूल विभागाला लागला होता. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी संजय बडदे, जेजुरीचे तलाठी बाळासाहेब ढमढेरे, तलाठी प्रफुल्ल व्यवहारे आदींनी छापा टाकून माती व मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करताना पकडले. या कारवाईत उत्खननासाठी वापरण्यात येणारी वाहने, दोन जेसीबी (एमएच १२ एबी ३२३ आणि एमएच २३ टी २०४०), एक टेम्पो (एमएच १२ केपी २२८१), तसेच एक ट्रॅक्टर (एमएच १२ एडी ४२२५) ही वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेली वाहने जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली असून, अनधिकृत उत्खनन आणि ऐतिहासिक तलावाला धोका निर्माण होईल, आशा स्वरूपाचे उत्खनन होत असल्याचा अहवाल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आला आहे. या वाहनांच्या मालकांची नावे समजू शकली नाहीत. त्यांच्यावर प्रांत कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी बडदे यांनी सांगितले.