शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडीपी क्षेत्रात होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 22:44 IST

पाषाण तलावातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला व तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

पुणे - बीडीपी क्षेत्रात होणारी अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. 

सध्या पुणे शहरात अनेक ठिकाणी टेकड्यांवर अनधिकृत टेकडीफोड व प्लॉटींगची कामे सरास चालू आहे व त्यावर कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार यासाठी महानगरपालिकेने बीट ऑफिसर नेमले आहेत परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत असे खा. वंदना चव्हाण यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार दर ६ महिन्यांनी Satelite Image काढणे सर्व महानगरपालिकांना बंधनकारक आहे वारंवार हि मागणी करून देखील आजतागायत महानगरपालिकेकडून दिरंगाई झालेली दिसते. याची विचारणा खा. चव्हाण यांनी केली.

ज्या जागा BDP क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत त्या लोकसह्भागातुन व विविध संस्थांच्या CER मधून विकसित, संवर्धित व हरित करण्याबाबत अनेक वेळेला मागणी करून देखील त्यावर कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. टेकडीफोड व प्लॉटींग संदर्भात नागरिक  तक्रारी करत असतात त्याचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेने एक खिड़की तक्रार निवारण केंद्र चालू करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. शहराचा विकास होत असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नाले व नैसर्गिक जलस्त्रोत बुजवली आहेत किंवा राडारोडा टाकला आहे. महानगरपालिकेने सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांचे यापूर्वी मपिंग केलेले असून नागरिकांच्या माहितीसाठी ते सार्वजनिक करावेत व या पद्धतिने होणारे अनधिकृत काम थांबवावे अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली.

पाषाण तलावातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला व तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी  खा. वंदना चव्हाण यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली. अनेक ठिकाणी राडारोडा व कचरा रस्त्याच्या दुतर्फा, नाले, तळे, हायवे, सार्वजनिक ठिकाणे आणि जेथे शक्य असेल तेथे टाकला जातो त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सदर बैठकीत करण्यात आली. यावेळेस Air Quality Report, निराधार भिक्षेकरी, COVID लसीकरणाबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.