शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेत मोजणी रोखली

By admin | Updated: June 30, 2015 00:04 IST

एकलहरे (ता. आंबेगाव) येथे सकाळी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. शेतकऱ्यांना भरपाई किती मिळणार व पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी समानजमीन संपादन करा

मंचर : एकलहरे (ता. आंबेगाव) येथे सकाळी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. शेतकऱ्यांना भरपाई किती मिळणार व पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी समानजमीन संपादन करा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने विशेष भूसंपादन अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलात बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. मग शेतकरी मोजणी करून देण्यास तयार झाले. दुपारनंतर मोजणीचे काम सुरू झाले होते. एकलहरे येथील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आज सकाळी प्रांत कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जे. गोळे यांसह अधिकारी मोजणीसाठी आले होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला. प्रस्तावित रस्ता कसा होणार आहे. भरपाई किती व कशा स्वरूपात मिळणार, याचे उत्तर दिल्याशिवाय मोजणी करून न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.या वेळी पोलीस बंदोबस्त बोलाविण्यात आला होता. शेतकऱ्यांचे शंकांचे निरसन कण्यासाठी मंचर येथील क्रीडा संकुलात बैठक घेण्यात आली.शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त फायदा व्हावा, हीच भावना असून शेतीबरोबरच विहीर, बोअरवेल, बांधकाम, हॉटेल झाडे यासाठीही भरपाई मिळेल. मोजणीनंतर शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी होईल, असे विशेष भू-संपादन अधिकारी संजय पाटील स्पष्ट केले. प्रांत कल्याण पांढरे यांनी भू-संपादनकामी जमिनीच्या मोजणीस विरोध न करता सहकार्य करण्याचे आवाहन केले. संतोष डोके, रामदास नामदेव डोके, सचिन काजळे, वासुदेव भालेराव, ललित राठोड, संजय थोरात, सतीश बेंडे, आदींनी शंका उपस्थित केल्या. त्यानंतर शेतकरी मोजणी करून देण्यास तयार झाले. दुपारनंतर मोजणीच्या कामाला सुरुवात झाली. या बैठकीला तांत्रिक व्यवस्थापक डी. एस. घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, प्रभारी भूमी अभिलेख अधिकारी भालेराव, स्वप्नील गाडीवड, एच. डी. भागवत, डी. एन. मडके, व्ही. व्ही. खोडे, ए. जी. दाभाडे, व्ही. एल. चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)‘‘पुणे-नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडत असून, अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. बाह्यवळणाची मोजणी सध्या होणार नसून, आहे त्या महामार्गालगत मोजणी होईल. शेतकऱ्यांना मागणीसाठी संमती दिल्याशिवाय व त्यांच्या सहकार्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. पण, कोणी अनावश्यक मुद्दे निर्माण करून शासकीय कामात अडथळा आणल्यास वेळप्रसंगी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे विशेष भू-संपादन अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.सहा पदरी रस्ता होणार असून, अकृषक शेतीला जास्त दराने भरपाई मिळेल. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.