Pune | पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 08:43 IST2022-12-19T08:43:01+5:302022-12-19T08:43:34+5:30

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा आणि पुणे -सोलापूर रस्त्यावर या दुर्घटना घडल्या. ...

Two youths killed in separate accidents in Pune city | Pune | पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार

Pune | पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा आणि पुणे-सोलापूर रस्त्यावर या दुर्घटना घडल्या. कोंढव्यातील खडीमशीन चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी ओंकार गौतम वाघमारे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार सुमीत म्हस्के (वय २०, रा. बिबवेवाडी) हा जखमी झाला. म्हस्के याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार म्हस्के आणि त्याचा मित्र वाघमारे कोंढवा-कात्रज रस्त्यावरील खडीमशीन चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी वाघमारे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचा चालक पळून गेला.

पुणे-सोलापूर रस्त्यावर उरूळी कांचन परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेने मालवाहू गाडीचालक युवकाचा मृत्यू झाला. अविनाश शिवाजी बागडे (वय १९, रा. माकर वस्ती, सहजपूर, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शिवाजी बागडे (वय ४८) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अविनाश बगाडे आणि त्याचे दोन मित्र हिंजवडीत माल घेऊन गेले होते. तेथून मालवाहू गाडीतून ते सहजपूरकडे निघाले होते. उरुळी कांचन परिसरात पहाटे तीनच्या सुमारास ते थांबले. मालवाहू गाडी रस्त्याच्या कडेला लावली. गाडीचा दरवाजा उघडून अविनाश प्रवेश करत होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने गाडीला धडक दिली. अपघातात अविनाशचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलिस उपनिरीक्षक घायगुडे तपास करत आहेत.

Web Title: Two youths killed in separate accidents in Pune city