मैत्रिणीना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 15:34 IST2020-12-05T15:33:27+5:302020-12-05T15:34:00+5:30

पोलिसांनी ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

Two-wheeler thief caught by police | मैत्रिणीना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

मैत्रिणीना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : मैत्रिणीला फिरविण्यासाठी व त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी दुचाकी चोरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सौरभ दत्तात्रय चोरगे (वय २०, रा. आंबेगाव पठार) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांचे पथक गस्त घालत असताना हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना माहिती मिळाली. त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यानाच्या कमानीच्या आत थांबलेल्या सौरभ दत्तात्रय चाेरगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीची दुचाकी सापडली. अधिक चौकशीत त्याने आणखी चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याने या मोटारसायकली चोरल्या होत्या. पोलिसांनी ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, चोरगे हा काहीही कामधंदा करत नाही. चोरगे याच्या अनेक मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी व त्यांना घेऊन फिरण्यासाठी त्याने या मोटारसायकली चोरल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler thief caught by police