शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

दुर्गम भागातील मुलींना मिळणार शिक्षण; महिन्याला मिळणार दोन हजार रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:28 PM

शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतला पुढाकार

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे ३० लाखांची तरतूद दुर्गम भागात विशेषत: आदिवासी व भटक्या समाजात या मुलींची संख्या अधिककाही तालुक्यात दरवर्षी जवळपास ५०विद्यार्थिनी शाळाबाह्य होत असल्याचा प्राथमिक अहवाल

पुणे :  जिल्ह्याच्या दुर्गम भागात, वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलींना विविध कारणांमुळे सातवीनंतर शिक्षण सोडावे लागते. त्यांचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे या मुली शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून त्यांच्या शिक्षण व राहण्याचा खर्च म्हणून महिन्याला दोन हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.  जिल्ह्याच्या वाड्या वस्त्यांवर, तसेच दुर्गम भागात सातवीपर्यंत शाळा आहे. मात्र, त्यानंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा तालुक्याच्या गावाला जावे लागते, तर काही विद्यार्थी शहरातही शिक्षणासाठी येतात. बाहेरगावी जावून शिक्षण घेणा-यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे. तर विद्याथीर्नी मात्र, सातवीनंतर शाळाबाह्य होतात, आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देऊन पालकांकडून त्यांना घरीच ठवेले जाते. दुर्गम भागात विशेषत: आदिवासी व भटक्या समाजात या मुलींची संख्या अधिक आहे. काही कुमारवयीन मुलींची सातवीनंतर लग्न लावून दिल्याचे प्रकारही पाहायला मिळतात. अशा शाळाबाह्य मुलींची संख्या कमी करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, गावापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या मुलींना राहण्याचा खर्च मिळावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. सातवीनंतर विद्यार्थिनी शाळाबाह्य होऊ नये, त्यांना माध्यमिक शिक्षण घेता यावे, यासाठी नव्याने ही योजना राबविण्यात येत आहे. काही तालुक्यात दरवर्षी जवळपास ५०विद्यार्थिनी शाळाबाह्य होत असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. सातवीनंतर शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थिनी  संख्या गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत निश्चित करून त्यांना लाभ देण्यात येईल.- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीzpजिल्हा परिषदEducationशिक्षण