शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मोटारीच्या धडकेने दोन महाविद्याालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोटारचालकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 7:56 PM

शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ २ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघाले होते. हॉटेल वुडस् समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली.

ठळक मुद्देयाप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय जमदाडे याला अटक

पुणे : मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार महाविद्याालयीन विद्यार्थी आणि त्याचा मित्र मृत्यूमुखी पडल्याची घटना भूगाव रस्त्यावर मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थी आणि त्याचा मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुणाल शर्मा (वय १८,रा. विमाननगर), मानस उपाध्याय (वय १८, रा. न्याती एम्पायर, खराडी) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.अपघातात ध्रुव बिष्णोई, शुभम मदार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरनाथ सिंग राजेश सिंग (वय १८,रा. खराडी, मुंढवा रस्ता) याने यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय जमदाडे (वय २५, रा. शिंदे पेट्रोल पंपानजीक, बावधन) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानस, कुणाल, ध्रुव , शुभम आणि अमरनाथ सिंग हे मित्र आहेत. ते पुण्यात शिक्षणासाठी आले असून एका शैक्षणिक संस्थेत ते शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ २ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघाले होते. मानस, कुणाल, ध्रुव, शुभम आणि अमरनाथ सिंग वेगवेगळ्या दुचाकीवरुन निघाले होते. भूगाव रस्त्यावर हॉटेल वुडस् समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मानस, कुणाल, धुव्र, मानस यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी मानस आणि कुणालचा मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस