शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्यांना लुटणारे दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:07 IST

चोरट्यांमध्ये भांडणे सुरु असताना चोरीच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला

ठळक मुद्देमोबाईल नंबर 'प्रिन्स साहेब' लिहून देत अडचण आल्यावर फोन करा असे सांगितले

पुणे : येरवडा भागात घरफोडी करुन जात असताना दोघा चोरट्यांमध्ये झालेली भांडणे सुरु असताना चोरीच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे़. या दोघांना अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी बडतर्फ केले आहे.पोलीस शिपाई नितीन फकीर शिंदे आणि आकाश बलदेव सिमरे अशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी, शिंदे आणि सिमरे हे २ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्रपाळीकरिता बीट मार्शल म्हणून नेमणूकीला होते. रुबी हॉस्पिटलसमोर दोघे भांडणे करीत असल्याची माहिती मिळाल्यावर ते तेथे पोहचले. त्या दोघांनाही ते मंगलदास पोलीस चौकीत घेऊन आले. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले. त्यांनी त्यांच्या चौकशी करुन वरिष्ठांना सांगण्याऐवजी त्या चोरीच्या मालातील २ सोन्याच्या बांगड्या व पेडंट त्यांनी काढून घेतले. शिंदे याने सिमरे याचा मोबाईल नंबर 'प्रिन्स साहेब' असा एका कागदावर लिहून दिला व काही अडचण आल्यावर फोन करा असे सांगून त्यांना सोडून दिले.याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात २ लाख ९९ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी शाहरुख सलीम शेख (वय १९, रा़ राजीव गांधीनगर, येरवडा) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे तपास करीत असताना घरफोडी केल्यानंतर रुबी हॉलसमोर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा पोलिसांनी आपल्याकडील दागिने काढून घेऊन मोबाईल क्रमांक देऊन सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीकडील मोबाईल नंबर हा नितीन शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. चोरीतील मालापैकी काही माल त्यांनी घेतल्याचे पुढे आल्यावर त्यांना मुद्देमाल हजर करण्याचा आदेश दिला गेला़  त्यांनी दागिने वितळवून त्याची २७ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड येरवडा पोलीस ठाण्यात हजर केली. घरफोडीतील आरोपी मिळून आल्यानंतरही त्यांना ताब्यात न घेता व वरिष्ठांना न कळविता त्यांच्याकडून दागिने काढून घेतल्याने दोघांना निलंबित करण्यात आले.त्यांची विभागीय  चौकशी करण्यात आली. आरोपी मिळून आले असताना त्यांच्यावर कारवाई केली असती तर भविष्यात त्यांच्याकडून होणारे गुन्हे रोखता आले असते. तसेच पोलीस दलात केवळ ७ वषार्ची सेवा झालेली असताना दोघांनी केलेले कृत्य हे पोलीस दलास काळीमा फासणारे आहे, अशा या कृत्यामुळेच पोलिसांची प्रतिमा जनमानसांत डागाळण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचा आदेश अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsuspensionनिलंबनThiefचोरtheftचोरी